जाहिरात

कुछ कुछ होता है... राहुल-अंजलीच्या लग्नात असा ट्विस्ट की पोलीस स्टेशमध्येच झालं लग्न

Marriage In Police Station: प्रत्यक्ष आयुष्यातील राहुल आणि अंजली यांच्या लग्नातही अनेक वळणं आले. त्यांच्या लग्नाच्या वेळी एक असा ट्विस्ट आला की त्यामुळे त्यांचं लग्न मोडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

कुछ कुछ होता है... राहुल-अंजलीच्या लग्नात असा ट्विस्ट की पोलीस स्टेशमध्येच झालं लग्न
मुंबई:

Marriage In Police Station: करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनच्या 'कुछ-कुछ होता है' हा सिनेमा बहुतेकांना माहिती आहे. या सिनेमात राहुल (शाहरुख खान) आणि अंजली (काजोल) यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. व्यावसायिक हिंदी चित्रपट असल्यानं या प्रवासात अनेक वळणं आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातील राहुल आणि अंजली यांच्या लग्नातही अशीच अनेक वळणं आले. त्यांच्या लग्नाच्या वेळी एक असा ट्विस्ट आला की त्यामुळे त्यांचं लग्न मोडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, अखेर पोलिसांनी सर्व परिस्थिती स्वत:च्या हाती घेत चक्क पोलीस स्टेशनमध्ये (wedding ritual) त्यांचं लग्न लावून दिलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

सूरतमधील वरछा भागात रविवारी झालेल्या लग्नात हा गोंधळ झाला. बिहारमधील राहुल प्रमोद महतो (Rahul Pramod Mahto) आणि अंजली कुमारी (Anjali Kumari) यांचं लग्न सुरतमधील लक्ष्मी हॉलमध्ये होत होता. सर्व काही सुरळीत सुरु होतं, पण नातेवाईकांना लग्नाचं जेवण वाढल्यानंतर गोंधळ सुरु झाला. नवऱ्याकडच्या मुलांनी खाण्याबाबत नाराजी व्यक्त केली. या छोट्या गोष्टीचं गंभीर प्रकरणात रुपांतर झालं आणि नवऱ्याकडच्या लोकांनी लग्न तोडण्याचा निर्णय घेतला. 

( नक्की वाचा : Udit Narayan उदित नारायणनं भर कार्यक्रमात महिला फॅन्ससोबत केले अश्लील वर्तन, फॅन्स संतापले Video )
 

नवरीची पोलीस स्टेशनमध्ये धावं

आपल्या स्वप्नातील लग्न तुटत असल्याचं पाहून अंजली आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव केली. पोलीस उपाधिक्षक (DCP) अलोक कुमार यांनी सांगितलं की, 'मुलीच्या दाव्यानुसार राहुल लग्नासाठी तयार आहे. पण, त्याच्या कुटुंबीयांना हे मान्य नाही. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.'

पोलीस स्टेशमध्ये लग्न (Couple Gets Married At Police Station)

बराच वेळ समजावल्यानंतर मुलाकडचे कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. पण, लग्नाच्या हॉलमध्ये पुन्हा भांडण होईल, अशी भीती मुलीला वाटत होती. त्यानंतर पोलिसांनी मोठा निर्णय घेत लग्नाचे विधी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यास परवानगी दिली. त्यानंतर पोलीस स्टेशमध्येच हे लग्न पार पडलं. 

राहुल आणि अंजलीच्या लग्नाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. DCP अलोक कुमार यांनी सांगितलं की, 'आम्ही मुलीचं भविष्य विचारत घेऊन सकारात्मक वृत्तीनं हे लग्न पूर्ण केलं. प्रेमापुढे काहीही टिक नाही, हे या गोष्टीनं दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर पोलीस फक्त कायद्यांचं रक्षण करत नाहीत तर नातीही वाचवतात, हे यामधून दिसून येत आहे.' 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: