जाहिरात

Viral Video: 'ओ! दादा जय श्री राम...', चिमुकला जोरात ओरडला, अजित पवार दचकले! VIDEO व्हायरल

Ajit Pawar Viral Video: एका चिमुकल्याने अजित पवारांसमोर केलेल्या घोषणेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Viral Video: 'ओ! दादा जय श्री राम...', चिमुकला जोरात ओरडला, अजित पवार दचकले! VIDEO व्हायरल

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध् आहेत. चुकेल त्याला तिथेच सुनावणाऱ्या, अधिकाऱ्यांची खरडपट्टी करणाऱ्या अजित पवारांची दादागिरी नेहमीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. त्यामुळे अजित पवारांसमोर आवाज काढायची हिंमत सहसा कोणी करत नाही. अशातच एका चिमुकल्याने अजित पवारांसमोर केलेल्या घोषणेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच कार्यकर्ते, अधिकाऱ्यांच्या गर्दीत असतात. अजित पवार यांना भेटण्यासाठी लहानांपासून- वृद्धांपर्यंत सर्वच जण गर्दी करत असतात. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांना भेटण्यासाठी अशीच कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी गर्दी केली होती. याच गर्दीत एक चिमुकला आपल्या आई वडिलांसोबत अजित पवारांच्या भेटीसाठी उभा होता, त्याने अजित पवारांना पाहून अशी काही घोषणा दिली की सर्वजण पाहत राहिले. 

पुणेरी स्पिक्स नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दादांच्या पुढे सर्वच बिनधास्त असतात, असा कॅप्शन दिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी चिमुकल्याच्या घोषणेने दादा घाबरले, अशी टिप्पणी केली आहे तर काही जणांनी दादांवर दादागिरी करणारा चिमुकला असे म्हणत त्याचे खास कौतुकही केले आहे. 

नक्की वाचा : शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधी नाशिकमध्येही खिंडार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: