जाहिरात

Maharashtra Politics: शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधी नाशिकमध्येही खिंडार

टेंभी नाका येथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश पार पडणार असून यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राजन साळवी यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रत्नागिरीत खिंडार पडले आहे.

Maharashtra Politics: शिंदेंची खेळी, ठाकरे गटाला गळती! राजन साळवींच्या पक्षप्रवेशाआधी नाशिकमध्येही खिंडार

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार आणि माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ठाण्यातील टेंभी नाका येथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश पार पडणार असून यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राजन साळवी यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रत्नागिरीत खिंडार पडले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना ठाकरे गटाचे दिग्गज नेते राजन साळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कालच राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर रात्री उशिरा त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून आज दुपारी तीन वाजता मोठे शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटात प्रवेश करतील.

दुसरीकडे राजन साळवी यांच्यामुळे ठाकरे गटाला रत्नागिरीत खिंडार पडले असतानाच नाशिकमध्येही धक्का बसला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पवन पवार,  मनसेचे माजी नगरसेवक, सभापती योगेश शेवरे तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नाशिकमधील गेल्या पंधरा दिवसात 8 माजी नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली असून एकनाथ शिंदेंच्या उद्याच्या आभार दौऱ्यात  मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. 

नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं

दुसरीकडे, कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे.  कुडाळ नगर पंचायतमधील महाविकास आघाडीच्या 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पाच तर काँग्रेसचे दोन असे एकूण सात नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर  प्रवेश केला आहे. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित नगरसेवकांसह अनेकांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला.