जाहिरात

मोकळ्या रानमाळावर सोनं पेरलं; एका स्विमिंग पूलमधून 22.5 लाखांची कमाई? सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

आजकाल उत्पन्न वाढविण्यासाठी लोक नवनव्या पद्धतीचा शोध घेत असतात. मात्र एका व्यक्तीने कथितपणे आपल्या जमिनीचा असा वापर केला की, त्याची कहाणी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोकळ्या रानमाळावर सोनं पेरलं; एका स्विमिंग पूलमधून 22.5 लाखांची कमाई? सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
स्विमिंग पूलमधून 22.5 लाख रुपये कमाई केल्याचा दावा व्हायरल.
(P.C- @poojaofficial5/X)

आजकाल उत्पन्न वाढविण्यासाठी लोक नवनव्या पद्धतीचा शोध घेत असतात. मात्र एका व्यक्तीने कथितपणे आपल्या जमिनीचा असा वापर केला की, त्याची कहाणी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल पोस्टनुसार, ही व्यक्तीने  आपल्या स्विमिंग पूलच्या पीक सीजनमध्ये तब्बल २२.५ लाखांची कमाई  केली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

पूजा नावाच्या एका कंटेन्ट क्रिएटरने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितलं की, नुकतीच ती एका मित्राच्या फार्मवर गेली होती. तेथील स्विमिंग पूल पाहून तिने मित्राला विचारलं की, यामधून काही कमाई होते का? की हा पूल केवळ शौक म्हणून तयार केलाय. यावर मित्राने उत्तर दिलं की, कमाई तशी बरी होते. मात्र थोड्या वेळाने तिने जे काही ऐकलं ते पाहून ती हैराण झाली.

नक्की वाचा - Phd विद्यार्थ्याची 9 ते 5 नोकरी, रात्री 11 नंतर बाईक टॅक्सी ड्रायव्हर; तरुणाची दिनचर्या पाहून थक्क व्हाल!


लाखोंच्या कमाईचा दावा...

या पोस्टमध्ये कंटेन्ट क्रिएटरने म्हटलं की, उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या मित्राच्या स्विमिंग पूलमध्ये दररोज ७०० ते ८०० लोक येतात. सुमारे ७५० हा आकडा गृहित धरला तर प्रती व्यक्ती तिकीट १०० रुपये धरले तरी एक दिवसाची कमाई तब्बल ७५,००० रुपयांपर्यंत जाते. या हिशोबानुसार, ३० दिवसात ही रक्कम जवळपास २२.५ लाखांपर्यंत पोहोचते. 


ऑफ सीजनमध्येही चांगली कमाई...

पूजाने सांगितलं की, पीक सीजन संपल्यानंतरही दररोज २५० लोक पूलमध्ये येतात. १०० रुपये प्रति तिकिटनुसार दररोज २५००० रुपयांची कमाई होते. म्हणजे महिन्यात ७.५ लाख रुपये उत्पन्न होतं. 

खर्च किती येतो?

पूजाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मित्राची स्वत:ची जमीन आहे. यासाठी भाड्याचे पैसे देण्याची गरज पडत नाही. पूलाची देखभाल करण्याची त्याने गार्ड ठेवला आहे. त्याला २०,००० रुपये महिना पगार दिला जातो. 

पाण्यातूनही होते कमाई...

पूजाने पुढे सांगितलं की, जेव्हा पूलाचं पाणी बदलावं लागतं तर ते फेकून दिलं जात नाही. तर ते पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी विकलं जातं. म्हणजे या पाण्याचा पुनर्वापर केला जातो.

सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया...

या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी यावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. शिवाय फोटोमध्ये पूल रिकामा असल्याचं दिसून येत आहे. तर क्लोरीन मिश्रित पाणी शेतीसाठी वापरलं जात नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या पोस्टमध्ये केलेला दाव्यामध्ये किती सत्यता आहे, याबाबत निश्चित सांगता येत नाही. मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


( Disclaimer:  ही बातमी सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याच्या पोस्टवर आधारित आहे. NDTV मराठी यावर कोणताही दावा करीत नाही. )

  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com