जाहिरात

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चेत नताशाचा नवा Video Viral

Natasa Stankovic Video:  गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चेत नताशाचा नवा Video Viral
Hardik Pandya Natasa Stankovic
मुंबई:

Natasa Stankovic Video:  गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. नताशाच्या एका जवळच्या मित्रानं याबाबत काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये दोघांची घटस्फोटाच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचा दावा केला होता. या सर्व घडामोडींमध्ये नताशानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नवा व्हिडिओ शेअर केलाय. नताशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. 

( ट्रेंडींग बातमी - हार्दिक पांड्या घरी परतण्यापूर्वी पत्नी नताशानं पोस्ट केला Video, घटस्फोटाच्या चर्चेला उधाण )
 

नताशा स्टेनकोविकनं 10 जुलै रोजी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तिनं लोकांच्या जजमेंटल होण्यावर प्रतिक्रिया दिलीय. ग्रे टॉपमध्ये कॉफी पित नताशा तिचा 'कॉफी टाईम' एन्जॉय करत सांगते, ' आपण सर्वजण किती लवकर निर्णय घेतो. आपण कुणाला स्वत:च्या मनाविरुद्ध काम करताना पाहिलं तर आपण शांत बसत नाही. त्याचं निरीक्षण करत नाही. त्याच्याबद्दल आपल्याला कोणतीही सहानुभूती नसते. आपण सरळ निर्णय घेऊ लागतो.'

T20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. नताशानं तिच्या इन्स्टाग्रामवरुन लग्नाचे तसंच हार्दिकसोबतचे सर्व फोटो काढून टाकल्यानंतर ही चर्चा सुरु झाली. काही दिवसांनतर नताशानं ते फोटो पुन्हा एकदा सार्वजनिक केले आहेत.

टीम इंडियानं नुकताच टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतरही नताशानं हार्दिक पांड्या किंवा टीम इंडियाचं अभिनंदन करणारी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली नाही.