Viral Video: सध्या इंटरनेटवर एका सरकारी शाळेतील लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ओडिशाच्या कटक येथील या मुलाने आपल्या शिक्षक आणि वर्गमित्रांसमोर बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या गाण्यावर केलेले जबरदस्त डान्स केला. लहानग्याचा हा डान्स पाहणारे मंत्रमुग्ध झाले.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही शिक्षक एका बेंचवर बसलेले आहेत. तर त्यांच्या समोर हा लहान मुलगा बिनधास्त डान्स करत आहे. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर 2' चित्रपटातील 'जनाब-ए-आली' या गाण्यावरील या लहान मुलाचा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.
मुलगा गाण्यावर नाचायला सुरुवात करतो, तसं त्याचे मित्र त्याचा उत्साह वाढवतात. ते टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देतात. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या दमदार डान्ससाठी हे गाणे ओळखले जाते, पण या छोट्या मुलाच्या सुपर कॉन्फिडन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
ऋतिक रोशनकडून कौतुक
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन थेट अभिनेता ऋतिक रोशनपर्यंत पोहोचला. डान्स पाहून ऋतिक रोशनही इप्रेस झाला. ऋतिकने देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, "Wow wonderful little kid…" ऋतिकच्या या कमेंटमुळे मुलाना भलताच आनंद झाला असेल यात शंका नाही.
धनश्री वर्मानेही केलं कौतुक
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर devil_edixz नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 3 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. धनश्री वर्माने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये 'फायर' इमोजी शेअर केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world