जाहिरात
Story ProgressBack

ओव्हरलोड ट्रक उलटला, शेकडो पोत्यांखाली दबला मुका जीव; VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

व्हायरल व्हिडीओमध्ये ओव्हरलोड ट्रकचे नियंत्रण सुटल्यानं तो उलटला आणि पुढे जे काही घडले ते पाहून युजर्सकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Read Time: 2 mins
ओव्हरलोड ट्रक उलटला, शेकडो पोत्यांखाली दबला मुका जीव; VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

सोशल मीडियावर रस्ते अपघातांचे भयावह व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळतात. व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यावरील दोन वाहनांची होणारी जोरदार धडक पाहिल्यानंतर अनेकदा आपले हृदय पिळवटून जाते. काही अपघात असेही असतात, ज्यामुळे जबर धक्काही बसतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाहने एकमेकांवर आदळली नाहीत, पण अपघातामुळे जे काही घडले ते अतिशय चीड आणणारे आहे. या व्हिडीओमध्ये एका ओव्हरलोड ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला आणि या अपघातात रस्त्याच्या कडेला शांतपणे बसलेल्या मुक्या प्राण्याचा दबून मृत्यू झाला. 

ट्रकखाली दबली गेली गाय 

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, सामानाने खचाखच भरलेला ट्रक रस्त्यावरून जात आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्याकडेला दोन गायी देखील दिसत आहेत. यानंतर छोट्याशा वळणावर आल्यानंतर या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि हे वाहन रस्त्यावरच उलटले. ट्रकमधील शेकडो पोत्यांखाली एक गाय दबली गेली. उभ्या असलेल्या गायीला जीव वाचवण्यात यश आले, पण बसलेल्या गायीला काही समजण्यापूर्वीच ट्रक तिच्यावर कोसळला. 

पाहा व्हिडीओ

"दुर्घटनेतून सर्वांनी घ्यावा धडा" 

इंस्टाग्रामवर आतापर्यंत 49.9 दशलक्षहून अधिक वेळा हा व्हायरल व्हिडीओ पाहिला गेला आहे. तसेच 3 लाख 33 हजार वेळा हा व्हिडीओ शेअर देखील करण्यात आलाय. युजर्स व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त करताहेत. या दुर्घटनेत गायीचा मृत्यू झाल्याने युजर्स शोक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही युजर्स ट्रक ओव्हरलोड करणाऱ्या बेजबाबदार लोकांविरोधात नाराजीही व्यक्त करताहेत. एका युजरने लिहिले की, "एखादे वाहन किती भार घेऊ शकते, याची ड्रायव्हरला समज नव्हती". दुसऱ्या युजरने म्हटले की, "गायीच्या जागी दुसरेही कोणी असू शकले असते. प्रत्येकाने या व्हिडीओतून धडा घेतला पाहिजे".

Weather Updates | मनमाडमध्ये खरीपाच्या पेरणीला वेग तर हिंगोलीतल्या रामेश्वर परिसरात ढगफुटीसारखा पाऊस

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Fathers Day: गौरवास्पद! IPS बापाकडून सलामी घेणाऱ्या IAS लेकीची गोष्ट
ओव्हरलोड ट्रक उलटला, शेकडो पोत्यांखाली दबला मुका जीव; VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
uK man sues apple after wife devorce due to Iphone unknown feature
Next Article
iphone च्या एका फीचरमुळे मोडलं लग्न; व्यक्तीने कंपनीविरोधात ठोकला दावा
;