जाहिरात
This Article is From May 22, 2024

Video : AC कोचमध्ये उंदरांचा धुमाकूळ, प्रवाशाची कुरतडली सुटकेस

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या (Jnaneswari Express) फर्स्ट एसी कोच (First AC coach)  मधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाची सुटकेस उंदरानं कुरतडली आहे.

Video : AC कोचमध्ये उंदरांचा धुमाकूळ, प्रवाशाची कुरतडली सुटकेस
कोलकाता-मुंबई रेल्वेतील एसी कोचमध्ये हा प्रकार घडला आहे.
मुंबई:

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (Jnaneswari Express) मधील फर्स्ट एसी कोच (first AC coach)  मधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाची सुटकेस उंदरानं कुरतडली आहे. कोलकाता ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेत 19 मे रोजी हा प्रकार घडला. हा प्रवासी या एक्स्प्रेसमधील एच1 केबिन ए मधून प्रवास करत होता. त्यानं उंदरानं खराब केलेल्या सुटकेसचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

एका पॅसेंजरनं ही पोस्ट शेअर केलीय. त्यामध्ये लाल आणि निळ्या सुटकेसची उंदरानं केलेली अवस्था दिसत आहे. त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार 'ट्रेन 121202 19 मे रोजी रवाना झाली होती. कोच एच1, सीट ए-2 पी एन आर 6535087042 प्रवाशाची उंदरानं कुरतडलेली सुटकेस. तक्रार दाखल करण्याचा अर्ध्या तासांपासून प्रयत्न करत आहे. 

रेल्वे सेवाच्या अधिकृत हँडलवरुन या पोस्टला उत्तर देण्यात आलंय. 'आम्हाला हे वाचून काळजी वाटली. लवकरच तुम्हाला मदत करु. आम्हाला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे. तुम्ही तुमची अडचण थेट railmadad.indianrailways.gov.in  नोंदवू शकता. किंवा, तातडीनं प्रश्न सुटावा म्हणून 139 नंबर डायल करा.'

( नक्की वाचा : Heat Wave मुळे शाळेत येत नव्हती मुलं, मुख्याध्यापकांनी वर्गात बनवला स्विमिंग पूल, Video )

नाराजीचा उद्रेक

@mumbaimatterz  या एक्स हँडलनं ही पोस्ट रिट्विट केल्यानंतर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यावर अनेकांनी रेल्वेवर टीका करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'रेल्वेनं या प्रकारात प्रवाशांना नुकसाना भरपाई दिली पाहिजे,' असं मत एका युझरनं व्यक्त केलंय. त्याचबरोबर अन्य युझर्सनीही रेल्वे प्रशासनाकडं नुकसान भरपाईची मागणी केलीय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com