जाहिरात

माझ्या बेडवर झोप... प्रसिद्ध शाळेच्या प्रिन्सिपलचे संतापजनक कृत्य, 15 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत केले भयंकर

Dehradun School News: देहरादूनच्या प्रसिद्ध कॅम्ब्रिज स्कुलमधील 15 वर्षांच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

माझ्या बेडवर झोप... प्रसिद्ध शाळेच्या प्रिन्सिपलचे संतापजनक कृत्य, 15 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत केले भयंकर
"Dehradun School News: प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापकाचे किळसवाणे कृत्य"
NDTV
  • देहरादूनमधील खासगी शाळेच्या मुख्याध्यापकावर 15 वर्षांच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे
  • आरोपी मुख्याध्यापकाने मुलाला आपल्या घरी ठेवून एकाच बेडवर झोपवले आणि मध्यरात्री अत्याचार केला
  • मुलगा घाबरल्याने शांत आणि एकटा राहू लागला, त्याच्या वर्तणुकीत मोठा बदल दिसून आला
देहरादून:

Dehradun School News: देहरादूनमधील एका प्रसिद्ध खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. मुख्याध्यापकावर शाळेतीलच एका 15 वर्षांच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने मुलाला आधी आपल्या घरी ठेवले आणि नंतर स्वतःसोबत एकाच बेडवर झोपवले. मध्यरात्री त्याने मुलासोबत असे काही केलं की ज्यामुळे विद्यार्थ्याला मोठा धक्का बसला आहे. मुलगा इतका घाबरला आहे की तो कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. उत्तराखंड पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकाचे मुलासोबत लाजीरवाणे कृत्य 

देहरादूनच्या प्रेमनगर पोलीस ठाण्यात मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा 15 वर्षांचा मुलगा एका खासगी शाळेत शिकतो. पण तो गेल्या काही काळापासून शांत आणि एकटा-एकटा राहत होता. बऱ्याच दिवसांपासून मुलाच्या अशा वर्तनाने त्रस्त होऊन जेव्हा त्याला विचारणा केली तेव्हा समजले की 'कॅम्ब्रिज स्कूल'च्या व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकाने त्याच्यासोबत केवळ अश्लील चाळेच केले नाहीत तर चुकीचे कामही केले.

(नक्की वाचा: Crime News: AI ला फसवून हत्या! 'Gemini'ला विचारले भलतेच प्रश्न; बंगळुरू ट्रिपल मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासा)

मुलावर केले अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि त्याचे आई-वडील जेव्हा मुख्याध्यापकाला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन सांगितले होते की ते मुलाला त्याच्याकडे सोडू शकतात. आई-वडील यासाठी तयार झाले. 28 जूनच्या रात्री मुलगा जेवण करून आपल्या खोलीत झोपण्यासाठी जाऊ लागला, तेव्हा मुख्याध्यापकाने त्याला थांबवले आणि स्वतःसोबत झोपवले. त्याने रात्री मुलावर अत्याचार केला. या घटनेनंतर मुलगा खूप घाबरला आणि शांत राहू लागला.

आरोपी मुख्याध्यापकाला अटक

पालकांच्या तक्रारीनंतर प्रेमनगर पोलीस ठाण्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पॉक्सो कायद्याच्या कलम 5(एफ), 6, 7 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाची संवेदनशीलतेची दखल घेत एसएसपी डेहराडून यांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले, ज्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आपला सखोल तपास सुरू केला आहे. महिला आणि बाल अपराधांशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून शाळेच्या व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकाला अटक करून न्यायालयात हजर केले, तिथून त्यांची न्यायालयीन कोठडीत  रवानगी करण्यात आली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com