जाहिरात

Viral VIDEO: प्लास्टिक कचरा फेकणाऱ्यांना पर्यावरणप्रेमीने शिकवला धडा! पण पद्धत अशी की सर्वत्र होतंय कौतुक

Viral VIDEO: उत्तराखंडमधील मसूरी रस्त्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका पर्यावरणवादी कार्यकर्त्याने चालत्या टॅक्सीतून प्लास्टिकचा कचरा फेकणाऱ्या पर्यटकांना थांबवून, तो कचरा त्यांना अत्यंत नम्रपणे परत केला.

Viral VIDEO: प्लास्टिक कचरा फेकणाऱ्यांना पर्यावरणप्रेमीने शिकवला धडा! पण पद्धत अशी की सर्वत्र होतंय कौतुक
The video was shared on Instagram by Anoop Nautiyal.
  • A man confronted tourists for throwing plastic waste from a moving taxi in Mussoorie
  • The incident was shared by Anoop Nautiyal, founder of an environmental advocacy group
  • Nautiyal returned the waste to the tourists and politely requested them not to litter
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Viral Video: निसर्गरम्य ठिकाणी आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या काही पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे अनेकदा निसर्गाची हानी होते. उत्तराखंडमधील मसूरी रस्त्यावरही असाच काहीसा प्रकार घडला. मात्र, एका व्यक्तीने चिडचिड न करता, हुल्लडबाजी न करता अत्यंत शांत आणि संयमीपणे या पर्यटकांना स्वच्छतेचा असा काही धडा शिकवला की, त्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

निसर्गरम्य घाटात टॅक्सीतून टाकला कचरा

हा व्हिडिओ 'अनुप नौटियाल' या एका पर्यावरणवादी व्यक्तीाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अनुप हे मसूरीच्या दिशेने प्रवास करत असताना, त्यांच्या पुढे चालणाऱ्या एका टॅक्सीमधील प्रवाशांनी गाडीच्या खिडकीतून प्लास्टिकचा कप आणि चमचा थेट रस्त्यावर फेकून दिला. हा प्रकार पाहून अनुप यांनी त्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी स्वतःची गाडी थांबवली आणि तो फेकला गेलेला प्लास्टिकचा कचरा उचलून थेट त्या पर्यटकांच्या गाडीपाशी गेले.

Video 

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

अपमानित न करता पटवून दिली चूक

व्हिडिओमध्ये अनुप नौटियाल पर्यटकांकडे जाण्यापूर्वी कॅमेऱ्यासमोर सांगतात की, "लोकांनी अशा प्रकारे कधीही कचरा फेकू नये, विशेषतः डोंगराळ भागात तर अजिबात नाही. अशी जागरूकता असणे अत्यंत गरजेचे आहे आणि मला आशा आहे की हे पर्यटक पुन्हा अशी चूक करणार नाहीत."

यानंतर ते पर्यटकांना तो कचरा परत करून आपल्या गाडीत परत येतात. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पर्यटकांनी त्यांची चूक मान्य केली का? त्यावर अनुप म्हणाले, "होय, त्यांनी आपली चूक मान्य केली आणि मी त्यांना उत्तराखंडमध्ये पुन्हा असे न करण्याची नम्र विनंती केली."

(नक्की वाचा-  Fuel Price Hike Today: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; चेक करा नवीन दर)

या व्हिडिओचे सोशल मीडियावर सर्वाधिक कौतुक होण्याचे कारण म्हणजे अनुप यांनी त्या पर्यटकांचा चेहरा कॅमेऱ्यासमोर आणून किंवा त्यांच्यावर ओरडून त्यांना लोकांसमोर अपमानित केले नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com