जाहिरात

Trending News: 3BHK फ्लॅटसाठी 1 लाख रुपये मागितलं भाडं, मालक जोमात भाडेकरू कोमात, म्हणाला लोकांना वेड लागलंय?

Trending News: लोकांना घर भाड्याने घेणे फार कठीण होतंय. अशात सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय.

Trending News: 3BHK फ्लॅटसाठी 1 लाख रुपये मागितलं भाडं, मालक जोमात भाडेकरू कोमात, म्हणाला लोकांना वेड लागलंय?
"Trending News: 3 BHK घरासाठी एक लाख रुपये भाड्याची मागणी"
Canva

Bengaluru 3BHK Flat Rent: बंगळुरूमध्ये घर भाडेतत्त्वावर घेणे दिवसेंदिवस कठीण आणि महाग होत चाललंय. कोरमंगला परिसरात राहणाऱ्या साहिल खान नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्ती केलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्याने म्हटलंय की, कुक टाउन परिसरात 3 बीएचके फ्लॅटसाठी दरमहा एक लाख रुपये इतकं भाडे मागितलं जातंय. ही माहिती वाचून अनेकांना धक्का बसलाय.  

"लोकांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही?"

साहिलने पोस्टमध्ये लिहिलंय की, "कुक टाउनमध्ये घरमालक 3BHK फ्लॅटसाठी एक लाख रुपये भाडे मागतोय. लोकांना वेड लागलंय का?" ही पोस्ट तुफान व्हायरल झालीय आणि युजर्स त्यांचे-त्यांचे मत व्यक्त करत आहेत. 

"घर खरेदी करा" या सल्ल्यावर दिलं उत्तर 

एका युजरने लिहिलंय की, ते तुम्हाला स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यावर साहिलने उत्तर दिलं की, मी याचा हिशेब केलाय, ते हास्यास्पद आहे. म्हणजे घर खरेदी करणं सध्या तितकंच कठीण आणि अव्यवहारिक वाटतंय.

लोकांनी व्यक्त केली चिंता 

पोस्टवर काही युजर्संनी स्वतःचे अनुभवही व्यक्त केले आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "मी देखील घर पाहण्यासाठी गेलो होते. परिस्थिती खरंच वेड लावणारी आहे. एका व्यक्तीने सल्ला दिला की, "मरप्पा गार्डन (Marappa Garden), मुद्दम्मा गार्डन (Muddamma Garden) किंवा एसके गार्डन (SK Garden) या ठिकाणी चौकशी करून पाहा. येथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये चांगला 3BHK फ्लॅट मिळेल". 

Viral Video: बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही...तरीही पत्नीला ठेवतो राणीसारखं Video पाहून म्हणाल: हेच खरं प्रेम

(नक्की वाचा: Viral Video: बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही...तरीही पत्नीला ठेवतो राणीसारखं Video पाहून म्हणाल: हेच खरं प्रेम)

HSR Layoutमध्येही वाढल्या घराच्या भाड्याच्या किंमती 

एक युजरने सांगितलं की, "HSR Layout परिसरातही घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. 3BHK घरासाठी 80,000 रुपये भाडे मागितलं जातंय, या इमारतीत पाण्याचा पुरवठा देखील व्यवस्थित नाही". या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की, बंळगुरू शहरामध्ये घरांचे भाडे सातत्याने वाढतायेत आणि सामान्य लोकांसाठी घर शोधणे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक बनलंय.

Shocking DNA Test: पती-पत्नीने DNA टेस्ट केली, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली,सासऱ्याचं धक्कादायक रहस्य उघड

(नक्की वाचा: Shocking DNA Test: पती-पत्नीने DNA टेस्ट केली, रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली,सासऱ्याचं धक्कादायक रहस्य उघड)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com