जाहिरात

Vaibhav Sooryavanshi : 'मला नाव सांगायची गरज नाही'; नाकाबंदी सांगत वैभव सूर्यवंशीला रोखलं, नाव विचारलं अन्..

क्रिकेट जगतात खळबळ उडवून देणारे १५ वर्षाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi : 'मला नाव सांगायची गरज नाही'; नाकाबंदी सांगत वैभव सूर्यवंशीला रोखलं, नाव विचारलं अन्..

Vaibhav Sooryavanshi Video : क्रिकेट जगतात खळबळ उडवून देणारे १५ वर्षाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी याला अखेर निवड समितीने भारतीय संघात सामील करून घेतलं आहे. आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई खेळासाठी निवडलेल्या टीममध्ये त्याला संधी देण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यानेही त्याचं कौतुक केलं असून, वैभवने आपली निवड त्याच्या पात्रतेने मिळवल्याचं म्हटलं आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये या तरुणाने ७७६ धावा केल्या. टी२० टीममध्ये निवड झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्याचा एक व्हिडिओ शेअर करून अभिनंदन केलं आहे. 

आयपीएल २०२५ मध्ये डेब्यू केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने क्रिकेटच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. त्याने अंडर १९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरोधात १७५ रन केल्या. भारताला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सच्या टीमने या सीजन आयपीएल प्लेऑफमध्ये बनविण्यात वैभवची कामगिरी महत्त्वपूर्ण होती. एलिमिनेटरमध्ये त्याने २९ बॉलमध्ये ७९ रन केल्या आणि तो बाद झाला. 

नक्की वाचा - Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा लहान भाऊ आशीर्वादची चर्चा का? वडीलांनी थेट सांगितलं

वैभवचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल...

राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक मजेशीर व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये वैभव एका छोट्याशा सायकलवर बसून हॉटेलच्या लॉबीमध्ये फिरताना दिसत आहे. कोणीतरी त्याला थांबवतं. 'नाकाबंदी आहे...थांब...नाव काय आहे तुझं?' यावर वैभव मोठ्या स्टाईलमध्ये म्हणतो... 'मला नाव सांगण्याची गरज नाही.' येथे त्याचा टी-शर्ट टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदलतो. राजस्थानच्या टीमने आपल्या स्टार ओपनरला टी२० टीममध्ये निवड झाल्याबद्दल मोठ्या आनंदाने अभिनंदन केलं.  

  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com