जाहिरात

Viral Video: कॉर्पोरेट जॉब सोडून रिक्षा का चालवतोय हा व्यक्ती? कहाणी ऐकून डोळ्यातून येतील अश्रू

Viral Video: सोशल मीडियावर एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. कॉर्पोरेट जॉब सोडून अखेर त्याच्यावर रिक्षा चालवण्याची वेळ का आली? याची माहिती त्याने व्हिडीओमध्ये दिलीय.

Viral Video: कॉर्पोरेट जॉब सोडून रिक्षा का चालवतोय हा व्यक्ती? कहाणी ऐकून डोळ्यातून येतील अश्रू
"Viral Video : कॉर्पोरेट जॉब सोडून रिक्षा का चालवतोय हा व्यक्ती"
Rakesh B Pal Instagram

Viral Video: सोशल मीडियाद्वारे अशा एक-एक कथा ऐकायला-पाहायला मिळतात की ज्यामुळे मनावरील ओझं हलकं होतं. बंगळुरूतील राकेश यांचीही कहाणी अशीच काहीशी आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सांगितलं की, कॉर्पोरेट जॉब सोडून त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहता-पाहता देशभरात व्हायरल झालाय आणि हजारो लोकांसाठी प्रेरणादायी देखील ठरतोय.  

'मी कॉर्पोरेट गुलाम नाही' राकेशच्या आयुष्यातील संघर्ष 

ऑटो ड्रायव्हर आता कॉर्पोरेट गुलाम राहिला नाही, असे कॅप्शन व्हिडीओवर दिसतंय. राकेश इंग्रजी भाषेत व्हिडीओमध्ये स्वतःची कहाणी सांगत आहेत. राकेश म्हणतायेत की, हे पाऊल त्यांनी अचानक उचललेले नाही, तर एका मोठ्या दीर्घ संघर्षानंतर हा निर्णय घेतला. आयुष्यातील अडचणींवर मात करू शकणार नाही, असेही क्षण त्यांच्या आयुष्यात आले. पण नंतर त्यांनीच स्वतःहून उत्तर दिलं की, जीवन मला नष्ट करू शकणार नाही किंवा मला हरवू शकणार नाही. त्यांच्या आवाजात भीती नव्हे तर आत्मविश्वास झळकत होता. 

राकेश पुढे असंही म्हणाले की, "जीवनात सर्वकाही आवश्यक आहे, जिवंत राहणे, अर्थ शोधणे आणि स्वतःचा आनंद स्वतःच निर्माण करणं" 

पैशांबाबत काय म्हणाले? (Bengaluru Auto Driver Viral Video)

राकेश यांनी स्पष्ट सांगितलं की, "पैसाही गरजेचा आहे, पण ही गोष्ट आयुष्याचं एकमेव सत्य नाही. उत्पन्नापेक्षा उद्देश अधिक महत्त्वाचा आहे. खडतर काळ आला तर पळून जाऊ नका, त्याचा सामना करा".

मला फक्त सर्वांचं भले झालेले हवंय, असे त्यांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं.  

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव (Inspiring Viral Video)

राकेश यांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. एकाने म्हटलंय की, "मी देखील कॉर्पोरेट जॉब सोडला, कठीण होतं. पण आज आनंदी आहे". दुसऱ्या युजरने लिहिलंय की, "मी MBA केलंय आणि अभिमानाने सांगतोय मी ड्रायव्हर आहे". नेटकऱ्यांनी राकेश यांच्या निर्णयाचं आणि जिद्दीचे कौतुक केलंय. 

खचून जाऊ नका, परिस्थितीचा सामना करा

सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वांनाच जिंकायचं आहे, त्यासाठी काहीजण सरळ मार्गी प्रयत्न करतात तर काहींचे मार्ग चुकीचे असू शकतात. पण जीवन म्हटलं की जिंकणं-हरणं आलंच. त्यामुळे एखादं संकट आलं किंवा वाईट गोष्टी निर्माण झाल्या तर खचून जाऊ नका. धैर्याने त्या परिस्थितीचा सामना करा, त्यातून मार्ग काढा. जीवनातील प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, पण चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खडतर प्रवास करावाच लागतो, हे लक्षात ठेवा. असाच काहीसा संदेश राकेश यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com