- कॅनडातील मध्यमवर्गीय जीवनमान भारताच्या तुलनेत अधिक दर्जेदार असल्याचा दावा केला आहे
- विशालने व्हिडिओत भारतातील महानगरांमधील ट्रॅफिक, हॉर्नचा गोंगाट आणि प्रदूषण यावर टीका केली आहे
- विशालच्या या व्हिडिओमुळे भारत आणि कॅनडाच्या जीवनशैलीवर इंटरनेटवर वाद सुरू झाला आहे.
Middle-Class Lifestyle: कॅनडात स्थायिक झालेल्या विशाल नावाच्या एका भारतीय तरुणाने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कॅनडातील मध्यमवर्गीय जीवन हे भारतातील जीवनमानापेक्षा 10 पटीने अधिक दर्जेदार असल्याचा दावा विशालने या व्हिडिओत केला आहे. या दाव्यामुळे इंटरनेटवर 'भारत विरुद्ध कॅनडा' असा नवा वाद सुरू झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर आता अनेक कमेंटही येत आहे. त्याने या व्हिडीओत कॅनडात हॉर्नचा गोंगाट नाही तर पक्षांचा किलबिलाट जास्त असतो असं ही म्हटलं आहे.
विशालने आपल्या व्हिडिओत भारतातील महानगरांमधील गोंगाट, ट्रॅफिक आणि प्रदूषणावर बोट ठेवले आहे. त्याच्या मते, भारतात सतत हॉर्नचा आवाज आणि गर्दीचा सामना करावा लागतो. तर कॅनडात रस्त्यांवर कमालीची शांतता असते. "येथे पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो आणि शुद्ध हवेत श्वास घेता येतो. जी भारतातील शहरांमध्ये आता चैनीची गोष्ट झाली आहे," असे त्याने नमूद केले. उत्तम पायाभूत सुविधा आणि नियमांचे पालन यामुळे तिथे जीवन अधिक संतुलित असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे कॅनडातील मध्यवर्गीयंचे जिवन हे भारता पेक्षा किती तरी पटने सरस असल्याचा दावा त्याने केला आहे.
सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. विशालच्या या मतावर नेटकऱ्यांनी दोन गट पडले आहेत. काहींनी त्याच्या मताचे समर्थन करत तिथल्या दर्जेदार जीवनमानाची प्रशंसा केली आहे. मात्र, दुसऱ्या गटाने भारताची बाजू सावरून धरली आहे. "कॅनडात सुविधा असतील, पण भारतात जे आपलेपण आणि संधी आहेत, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही," "परदेशातील रस्ते चांगले असतील, पण तिथला एकटेपणा आणि थंडी सहन करणे सोपे नाही," असे काही युजर्सनी म्हटले आहे. तर काहींनी "आपल्या देशातील माणुसकी आणि सण-उत्सव परदेशात कुठे मिळणार?" असा सवाल विचारला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world