जाहिरात

Viral Video: भिंत आणि लिफ्टच्या मध्ये चिरडला जाणार होता, पण... अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल

Viral Video: लिफ्टच्या भीषण अपघातातून एक व्यक्ती थोडक्यात बचावल्याचा व्हिडीओ समोर आलाय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: भिंत आणि लिफ्टच्या मध्ये चिरडला जाणार होता, पण... अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल
"Viral Video: लिफ्ट अपघाताचा भीषण व्हिडीओ व्हायरल"
  • गुजरातच्या वलसाडमधील सरदार हाइट्समधील साबरमती बिल्डिंगमध्ये लिफ्टचा भीषण अपघात
  • इमारतीतील रहिवासी वत्सलभाई पांचाळ जखमी
  • रहिवासी लिफ्टमधून बाहेर पडत असताना लिफ्ट अचानक सुरू झाली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Lift Accident Viral Video: गुजरातच्या वलसाड शहरातील अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. वलसाड येथील सरदार हाइट्समधील (गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुल) साबरमती बिल्डिंगमध्ये सकाळी-सकाळी लिफ्टचा भीषण अपघात झाला. या घटनेचे धडकी भरवणारे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एक व्यक्ती लिफ्टमधून बाहेर पडत असतानाच लिफ्टचा अचानक अपघात झाला. या अपघातात संबंधित व्यक्ती जखमी झाल्याचे म्हटलं जातंय. वत्सलभाई पांचाळ असे जखमी व्यक्तीचे नाव आहे आणि ते याच इमारतीचे रहिवासी आहेत. 

पाय बाहेर काढताच लिफ्ट वेगाने वर गेली

3 मार्च रोजीची ही घटना आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, वत्सलभाई पांचाळ लिफ्टमधून बाहेर येत होते. त्यांनी एक पाय बाहेर ठेवला आणि ते पूर्णपणे बाहेर पडणार इतक्यात अचानक लिफ्ट सुरू झाली. यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते पडले.

लिफ्टच्या अपघाताचा भयानक व्हिडीओ

(नक्की वाचा: 'ना पाणी, ना जेवण... मी मॉस्को विमानतळावर भिकाऱ्यासारखा उभा आहे!'; मुंबईकर तरुणाची मदतीसाठी आर्त हाक)

दार उघडे असतानाच लिफ्ट सुरू झाली अन्... 

गुजरातच्या वलसाडमधील सरदार हाइट्सच्या साबरमती बिल्डिंगमध्ये सकाळच्या सुमारास हा गंभीर अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे रहिवासी वत्सलभाई पांचाळ लिफ्टमध्ये अडकल्याने जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेची भीषणता स्पष्टपणे जाणवते. अवघ्या काही सेकंदाचा फरक पडला असता, तर वत्सलभाई लिफ्ट आणि भिंतीच्या मधोमध अडकून चिरडले गेले असते. नशिबाने त्यांचा जीव वाचला.

लिफ्टची सुरक्षा आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह

प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात वत्सलभाई यांना गंभीर अंतर्गत जखमा झाल्या आहेत. इतकी मोठी घटना घडूनही त्यांचा जीव वाचणे हा एक चमत्कारच मानला जात आहे. पण या घटनेने उंच इमारतींमधील लिफ्टची सुरक्षा आणि त्यांच्या नियमित देखभालीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण जात आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com