Viral News: ताई आजारी, बहिणीने शिजवली वेगळीच खिचडी!18 वर्षीय मेहुणी आणि 55 वर्षांच्या भाऊजीची Love Story फुलली

Viral News: 18 वर्षीय मेहुणी 55 वर्षांच्या भाऊजींच्या प्रेमात पडली. आजारी ताईला मदत करण्यासाठी जाणाऱ्या बहिणीने तिच्याच नवऱ्यासोबत लग्न केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनोख्या लव्ह स्टोरीमागील सत्य काय आहे? NDTV या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Viral News: 18 वर्षीय मेहुणीने 55 वर्षीय भाऊजीसोबत लग्न केले"
Media Munch Instagram

Viral News: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असते, हे वाक्य तुम्ही आजवर अनेकदा ऐकले असेल. सोशल मीडियावर देखील अशाच काहीशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. प्रेम खरं असेल तर त्यामध्ये जातपात, धर्म-पंथ अगदी वयाचंही बंधन आडवे येत नाही. हीच गोष्ट व्हायरल झालेल्या या अनोख्या लव्हस्टोरीमध्ये पाहायला मिळतेय. या दोघांनी वयाला प्राधान्य देण्याऐवजी भावना जपल्या आहेत. भाऊजी आणि मेहुणीमधील लव्हस्टोरी अशीच काहीशी आहे. सोशल मीडियावर या अजब प्रेमाची गजब गोष्टी तुफान व्हायरल होत आहे. केस पांढरे झालेल्या भाऊजीशेजारी उभे राहून स्वतः मेहुणीने त्यांची हटके लव्हस्टोरी लोकांना सांगितली. पण मंडळींनो जास्त आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. ही प्रेमकहाणी खरी नाहीय. व्हिडीओतील पात्र केवळ व्ह्युज मिळवण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करतात.

पाहा Video:

(नक्की वाचा: 240 Crore Lottery News: तरुणासाठी आईच्या जन्मतारखेचे लॉटरी तिकीट ठरलं लकी, 240 कोटी रुपयांचा लागला जॅकपॉट)

जेवण करता-करता प्रेमाचं नातं निर्माण झालं

मीडिया मंच ऑफिशिअल नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरील मेहुणी-भाऊजीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओतील माहितीनुसार, 18 वर्षीय मेहुणी 55 वर्षीय भाऊजीच्या प्रेमात पडली. तुम्ही पाहू शकता गुलाबी रंगाची साडी नेसून नटूनथटून मेहुणी मुलाखतीसाठी उभी आहे आणि तिच्या शेजारी केस पिकलेला, दाढी वाढलेला भाऊजी दिसतोय. प्रेमकहाणी कशी फुलली, याची माहिती मेहुणीने या व्हिडीओमध्ये सांगितलीय. ताईची प्रकृती खराब झाली होती, तेव्हा ती त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येत असे. यावेळेस दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि प्रेमाचे नातं फुलले, यानंतर दोघांनी लग्नही केले.

(नक्की वाचा : Viral Video: पोटात 7 महिन्यांचं बाळ, मैदानात उतरली, पोट आत घेऊन तब्बल 145 किलो वजन उचललं; लोकांचे डोळेच फिरले)

बहिणीचं काय झालं, नेटकऱ्यांचा सवाल?

मेहुणी-भाऊजीची प्रेमकहाणी ऐकल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स एकापेक्षा एक गंमतीशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने विचारलंय की, ताईची प्रकृती सुधारली की नाही? दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, ताई कुठेय?. एका युजरने लिहिलंय की, बाबू मोशाय प्यार तो अंधा होता है. आतापर्यंत हा व्हिडीओ 25 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलाय.

Advertisement