- मदुराईच्या ७६ वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे
- मालती या महिला अधिकाऱ्यांनी पोलीस सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर प्राण्यांच्या कल्याणासाठी काम सुरू केले आहे
- त्या तामिळनाडूतील तिरुप्परंकुंड्रम भागातील सहा ठिकाणी दर शनिवारी माकडांना अन्न पुरवतात आणि काळजी घेतात
काही लोक निवृ्त्तीनंतर एकांतात राहाणे पसंत करतात. ते त्यांचं निवृत्तीचं जिवन जगत असतात. पण काही जण निवृत्तीनंतर ही आपलं काम सुरू ठेवतात. पण हे काम वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. त्यातून त्यांना आनंद आणि समाधान मिळतं. मदुराई येथील एका 76 वर्षीय निवृत्त महिला पोलीस अधिकाऱ्याने निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. मालती असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या गेल्या 10 वर्षांपासून शेकडो माकडांची काळजी घेत आहेत. त्या त्यांना अन्न पुरवतात. त्यांच्या या उपक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मालती या तामिळनाडू पोलीस दलात कार्यरत होत्या. त्यांनी जवळपास 33 वर्षे आपली सेवा दिली. 2010 मध्ये त्या पोलीस सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपली सेवा बजावली होती. मात्र, निवृत्तीनंतर केवळ आराम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. काही तरी वेगळं काम करावं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी प्राण्यांची सेवा करण्याचं ठरवलं. त्यातून 2015 पासून प्राण्यांच्या कल्याणासाठी त्या काम करू लागल्या. पाहता पाहता हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. शिवाय त्यातून त्यांना आनंद ही मिळू लागला.
मालती दर शनिवारी तामिळनाडूच्या तिरुप्परंकुंड्रम भागात जातात. तिथे त्यांनी सहा ठिकाणं निवडली आहेत. यामध्ये मुरुगन मंदिर परिसर, सरवण पोइगई, गुफा मंदिर आणि ऐतिहासिक किल्ल्याचा परिसराचा समावेश आहे. या ठिकाणी मालती जातात. त्यानंतर त्या माकडांना आवाज देतात. त्यांचा आवाज ऐकून शेकडो माकडं त्यांच्याभोवती जमा होतात. या परिसरात जवळपास 350 ते 400 माकडं आहेत. ते त्यांचा आवाज ऐकून लगेच तिथे जमा होता. मालती यांचा आवाज या माकडांना ही परिचयाचा झाला आहे.
मालती यांचे वाढते वय आणि आरोग्याच्या तक्रारी याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यावर मात करत मालती यांनी आपला उपक्रम अखंड पणे चालवला आहे. काही असलं तरी त्या या माकडांना अन्न देतात. "या मुक्या प्राण्यांची सेवा करून मला जे मानसिक समाधान मिळते, तीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे असं त्या सांगतात. जोपर्यंत माझे शरीर साथ देईल, तोपर्यंत मी हे काम करत राहीन," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या कार्याचे कौतूक सर्वस्तारातून केले जात आहे.
#WATCH | Tamil Nadu: Malathi, a 76-year-old resident of Madurai, has been using a significant portion of her pension to feed monkeys living around Tirupparankundram since 2015. Despite her age and health challenges, she continues to visit several locations every Saturday, where… pic.twitter.com/3PBRtmdOao
— ANI (@ANI) June 23, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world