Woman Dangling From 10th Floor : सोशल मीडियावर (Social Media)सध्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कुणाचेही हृदय धस्स होईल. या व्हिडिओमध्ये एका विवाहित पुरुषाची कथित प्रेयसी (Girlfriend) स्वत:चा जीव वाचवण्यासाठी चक्क 10 व्या मजल्याच्या खिडकीला लटकलेली दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, तिने असे धोकादायक पाऊल उचलले तरी का?
काय आहे प्रकरण?
तिच्या प्रियकराची पत्नी अचानक घरी परतली, त्यावेळी हा थरार सुरु झाला. गुआंगडोंग (Guangdong), चीन (China) मधील ही घटना एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखीच आहे. एका विवाहित पुरुषासोबत त्याची प्रेयसी फ्लॅटमध्ये होती. अचानक दाराची किल्ली फिरवल्याचा आवाज आला आणि त्याची पत्नी घरी परतली.
या गडबडीत घाबरलेल्या पतीने स्वतःला वाचवण्यासाठी कथितरित्या आपल्या प्रेयसीला खिडकीतून बाहेर जाण्यास सांगितले. रिपोर्ट्सनुसार, या महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी 10 व्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर लटकून धोकादायक पाऊल उचलले.
( नक्की वाचा : Kalyan News : शाळेत खेळायचं वय...पण हातात शिट्टी! कल्याणमधील वाहतूक कोंडीने चिमुकल्यावर कामाची वेळ आणली, Video )
काय आहे Video?
व्हायरल व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेली ही महिला खिडकीच्या बाहेर असलेल्या एका अतिशय अरुंद कडेवर (Narrow ledge) चालताना दिसते. 10 व्या मजल्याखाली मृत्यूचा धोका असताना, तिचा प्रियकर मात्र गायब झाला होता. ती कशीबशी पाईप पकडून खालच्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न करते. एका क्षणाला ती पूर्णपणे पाईपला लटकते आणि शेजारच्या खिडकीवर थाप मारण्याचा प्रयत्न करते. हे दृश्य इतके भयानक आहे की पाहणाऱ्यांचाही श्वास रोखला गेला.
चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platforms) हा व्हिडिओ वेगाने पसरला आहे. लाखो लोक या घटनेला विवाहबाह्य संबंधांची सर्वात धोकादायक परिणती म्हणून पाहत आहेत. तर मृत्यूच्या दारात ढकलेल असं प्रेम काय कामाचं? अशी प्रतिक्रिया काही युझर्सनी दिली आहे. तर, अनेकांनी विवाहित पुरुषाला क्रूर आणि 'सर्वात मोठा दोषी' ठरवले आहे.
इथे पाहा Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world