जाहिरात

अजब! कंडोमचा वापर करुन केली फसवणूक, तरुणाने तब्बल 63 हॉटेल्सना लावला चुना

एका तरुणाने केलेली एक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याने झुरळ अन् कंडोमचा वापर करुन तब्बल ६६ हॉटेल्सना चुना लावला.

अजब! कंडोमचा वापर करुन केली फसवणूक, तरुणाने तब्बल 63 हॉटेल्सना लावला चुना

चीन: आजपर्यंत ऑनलाईन फसवणूक, सायबर फसवणुक असे अनेक प्रकार ऐकायला, वाचायला मिळतात. पैसे मिळवण्यासाठी लोक नवनव्या युक्त्या शोधत असतात. मात्र कंडोम अन् झुरळाचा वापर करुन फसवणूक केल्याचा प्रकार कधी ऐकला नसेल. चीनमधील एका तरुणाने केलेली एक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याने झुरळ अन् कंडोमचा वापर करुन तब्बल ६६ हॉटेल्सना चुना लावला. काय आहे हे प्रकरण वाचा सविस्तर ...

चीनमध्ये एका तरुणाने केलेल्या अजब फसवणुकीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या तरुणाने चक्क झुरळ अन् कंडोमचा वापर करुन तब्बल 66 हॉटेल्सवाल्यांना गंडा घातला. जियांग सरनेस नावाच्या या तरुणाने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. कॉलेजकडून शिष्यवृत्ती मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र कॉलेजची शिष्यवृत्ती न मिळाल्याने आणि पैसे नसल्याने या तरुणाने असा फसवणुकीचा प्लॅन शोधून काढला.

नक्की वाचा: 'जनतेचा कौल बदलला, आम्ही काय करणार?' बाबा आढाव यांच्यासमोर अजित पवारांचा सवाल

साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) च्या रिपोर्टनुसार, जियांग हॉटेलमध्ये अगदी रुबाबात एन्ट्री करायचा. त्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या खात्यातील वरिष्ठ अधिकारी किंवा प्रसिद्ध व्यावसायिकासारखा वेशभूषा करत असे. त्याचा तो थाट पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सहज खोली दिली. त्यानंतर तो पिशवीतून आणलेले मेलेले झुरळ, वापरलेले कंडोम आणि  केसांचे तुकडे रुममध्ये फेकायचा आणि हॉटेलमध्ये अस्वच्छता असल्याची तक्रार करायचा. या युक्तीमुळे हॉटेलवाले त्याच्या जाळ्यात सापडायचे आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्याला फुकटात राहू द्यायचे तसेच नुकसानभरपाई म्हणून पैसेही द्यायचे.

महत्वाची बातमी: शेकोटीवर हात शेकताना मुली अचानक कोसळल्या, तिघींचाही मृत्यू

अशा प्रकारे त्याने संधीचा फायदा घेतला. गेल्या 10 महिन्यांत जियांगने एकाच दिवसात 3-4 हॉटेल्स तपासल्या. तो थेट हॉटेल कर्मचाऱ्यांना पोलिसांत तक्रार करण्याची तसेच ऑनलाइन उघडकीस आणून त्यांची बदनामी करायची धमकी देत असे. ज्यातून सुटण्यासाठी ते त्याला रक्कम देत असतं. एकामागून एक अनेक हॉटेलवाल्यांना अशा घटनांचा अनुभव आल्यानंतर हे प्रकरण असोसिएशनपर्यंत पोहोचले.

एका हॉटेलमध्ये जियांगने गोंधळ घातला आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलवण्याबाबत बोलले तेव्हा त्याने तडजोड करण्यास सहमती दर्शवली. परंतु हॉटेल मालकांनी असोसिएशनसमोर त्यांचे म्हणणे मांडले.  असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात पोलिसांना बोलावले. या घटनांबाबत त्यांनी इतर अनेक हॉटेल्सशी चर्चा केली आणि त्याच पाहुण्यांसोबत वारंवार घडणाऱ्या अशाच घटना लक्षात आल्यावर पोलिसांना संशय आला.

त्यांचा संशय दूर करण्यासाठी पोलिसांनी जियांगला चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून तो 300 हून अधिक हॉटेल्समध्ये राहिला होता आणि त्यापैकी 63 हॉटेल्समध्ये  ४३९७२३ रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. 

नक्की वाचा: दरे गावी आलेल्या एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: