जाहिरात

Donald Trump : US-मेक्सिको सीमेवर आणीबाणी, अमेरिकेत आता नो ट्रान्सजेंडर; राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचे 10 आदेश

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतली.

Donald Trump : US-मेक्सिको सीमेवर आणीबाणी, अमेरिकेत आता नो ट्रान्सजेंडर; राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचे 10 आदेश

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी शपथ (donald trump inauguration) घेतली. सर्वप्रथम जेडी व्हान्स यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली त्यानंतर चिफ जस्टीस जॉन रॉबर्ट्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक बदल होणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानुसार ट्रम्प यांनी दहा महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

Donald Trump oath:  अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रंम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार

नक्की वाचा - Donald Trump oath: अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रंम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार

  
राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांचे 10 आदेश

  1. घुसखोरी रोखण्यासाठी यूएस-मेक्सिको सीमेवर आणीबाणी घोषीत, घुसखोरी होणाऱ्या दक्षिण सीमेवर सैनिक तैनात करणार.
  2. इंधन तेल आणि गॅसच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणीचीही घोषणा
  3. अमेरिकेत आता नो ट्रान्सजेंडर, अधिकृतपणे फक्त महिला आणि पुरुष असे दोनच लिंग असतील, ट्रान्सजेंडरच्या सुविधा समाप्त
  4. इलेक्ट्रीक वाहनांनीच कार्यालयात येण्याची अनिवार्यता समाप्त, वाटेल ती कार खरेदी करण्याचा आता अधिकार
  5. कोविडच्या दरम्यान हटवलेल्या 8 हजार सैनिकांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश
  6. इतर देशातून येणाऱ्या वस्तू आणि सेवांवर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कर आणि शुल्क लावण्याचा आदेश
  7. अमेरिकेत सरकारी सेन्सॉरशिप समाप्त, भाषणाचं स्वातंत्र्य पूर्णपणे पाळण्याचे आदेश
  8. जागतिक व्यापाराच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला पनामा कालवा परत घेणार
  9. हेल्थ आणि एज्युकेश सिस्टीममध्ये सुधारणा करणारा आदेश, दोन्ही खराब झाल्याचं ट्रम्पचं वक्तव्य
  10. अमेरिकन अंतराळवीरांना आता मंगळावर पाठवणार, अमेरिकन झेंडा फडकवणार

Listen to the latest songs, only on JioSaavn.com