अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांचे त्यांचे कट्टर समर्थक आणि जवळचे व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. टेस्ला (Tesla) कंपनीचे मालक आणि X (पूर्वीचे ट्विटर) याचे संचालक मस्क यांनी ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी फार पूर्वीपासून पाठिंबा दिला होता. मस्क यांनी वेळोवेळी मांडलेल्या भूमिकांचा ट्रम्प यांना मोठा फायदा झाला होता. X वरून मस्क सातत्याने कमला हॅरीस आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ले चढवत होते. विजयानंतर ट्रम्प यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या मंडळींना चांगली मंत्रिपदे देण्यास सुरुवात केली असून मस्क यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे. Department of Government Efficiency अर्थात कार्यक्षमता मंत्रालयाचे मंत्री म्हणून मस्क यापुढे काम पाहतील.
नक्की वाचा :ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात फॉक्स न्यूजचा वृत्तनिवेदक बनणार संरक्षणमंत्री?
मस्क हे ट्रम्प यांच्याप्रमाणे राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत येण्यास इच्छुक असलेले त्यांच्यात पक्षाचे म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे विवेक रामास्वामी यांच्यासोबत काम करताना दिसतील. रामास्वामी यांनी सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पदासाठी प्रयत्न केले होते, मात्र ट्रम्प यांच्यामुळे त्यांना आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागले होते. रामास्वामी हे देखील ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जातात.
नक्की वाचा :'PM मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या', दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञांनी केली मागणी
सरकारी अधिकाऱ्यांनी, न्यायव्यवस्थेतील अधिकाऱ्यांवर ट्रम्प यांचा बराच राग आहे. प्रशासनातील बरेचसे अधिकारी हे नाठाळ, अकार्यक्षम असल्याचा आरोप केला जातो. या सगळ्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि धडा शिकवण्यासाठी कार्यक्षमता मंत्रालय तयार करण्यात आले असून मस्क आणि विवेस रामास्वामी या नाठाळांना वठणीवर आणण्याचे काम करताना दिसतील. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना कार्यक्षम करण्यासोबत प्रशासनाकडून होणारी उधळपट्टीही थांबवण्याचा ट्रम्प सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठीही मस्क आणि रामास्वामी मिळून प्रयत्न करताना दिसतील. या सगळ्यासाठी 4 जुलै 2026 ची मुदत या दोघांना देण्यात आली आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरानामा प्रसिद्ध झाल्याला 250 वर्ष पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर ही मुदत निश्चित करण्यात आली आहे.
नक्की वाचा : बायको आणि 4 गर्लफ्रेंडसह एकाच सोसायटीत राहत होता तो, आणि एका दिवशी...
मंत्रीमंडळ छोटं मात्र कार्यक्षम असावे असा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. आपल्या या निर्णयामुळे प्रशासनातील अनेकांना धक्का बसेल आणि उधळपट्टी करणाऱ्यांना दणकाही बसेल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. रिपब्लिकन पक्षाने सरकारतर्फे केला जाणाऱ्या खर्चावर अनेकदा टीका केली आहे. त्यासाठीच सत्तेत येताच ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला. मस्क आणि रामास्वामी हे विविध मान्यवरांकडून सरकारला अधिक कार्यक्षम करण्यासाठीच्या सूचना मागवतील आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world