जाहिरात
Story ProgressBack

हवेत धोकादायक पद्धतीनं हलू लागलं विमान, सिंगापूर एअरलाईन्समध्ये घडला भयंकर प्रकार

Horror On Singapore Airlines Flight : वादळी वाऱ्यामुळे विमान हवेत धोकादायक पद्धतीनं हेलकावे घेत होते. त्याचा प्रवाशांना फटका बसला.

Read Time: 2 mins
हवेत धोकादायक पद्धतीनं हलू लागलं विमान, सिंगापूर एअरलाईन्समध्ये घडला भयंकर प्रकार
सिंगापूरला जाणाऱ्या विमानाचा मार्ग 'या' प्रकारामुळे कॅप्टनला बदलावा लागला.
मुंबई:

Horror On Singapore Airlines Flight :  लंडनहून सिंगापूरला जात असलेल्या सिंगापूर एअरलाईन्सच्या 777-300ER या विमानाला गंभीर एअर टर्बूलेंसचा फटका बसलाय. या विमानातील एका प्रवाशाचा यामध्ये मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. एअर टर्बूलेंसमुळे विमानाला बँकॉकमध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. BBC नं दिलेल्या वृत्तानुसार या विमानात 211 प्रवासी आणि 18 क्रू मेंबर होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सिंगापूर एअरलाईन्सच्या या विमानानं मंगळवारी लंडनहून उड्डाण केले होते. हे विमान संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर उतरणार होते. पण, प्रवासादरम्यान ते खूप वेगानं हेलकावे घेऊ लागले. त्यामुळे कॅप्टनला विमानाचा मार्ग बदलावा लागला. बँकॉकच्या विमानतळावर दुपारी 3.45 मिनिटांनी हे विमान उतरवण्यात आले. तोपर्यंत एका प्रवाशाचा मृत्यू झाला. विमान उतरल्यानंतर तातडीनं जखमी प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

सिंगापूर एअरलाईन्सनं या प्रवासात मृत्यू पावलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. जखमी प्रवाशांना वैद्यकीय मदत देण्यासाठी थायलंडमधील यंत्रणांशी संपर्क साधला आहे. आम्ही एक टीम बँकॉकला पाठवत आहोत, असं एअरलाईन्सनं स्पष्ट केलंय. 

( नक्की वाचा : किर्गिस्तानमध्ये काय घडलं? ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं? )
 

एअर टर्बुलेंस म्हणजे काय?

विमानाचं उड्डाण सुरु असताना त्याच्या पंखांना वादळी हवा धडकली तर विमानात एअर टर्बुलेंसची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे विमान निश्चित उंचीपेक्षा खाली-वर होऊ लागतं. त्यामुळे पॅसेंजर्सना झटके बसतात. आकाशात वीज चमकणे किंवा भरपूर ढगाळ वातावरण असेल तरी विमानात टर्बुलेंसची परिस्थिती निर्माण होते. 

अनेकदा एअर टर्बुलेंसमध्ये विमान अचानक निश्चित उंचीपेक्षा काही फूट खाली येते. त्यामुळे ते आता पडत आहे, असं प्रवाशांना वाटतं. ओबडधोबड रस्त्यावर कार चालवण्यासारखाच हा प्रकार आहे. काही टर्बुलेंस हे हलके असतात. तर काही गंभीर असतात. यामध्ये प्रवाशांना पॅनिक अटॅक येऊ शकतो, जे त्यांच्या मृत्यूचं कारण होऊ शकतं.

( नक्की वाचा : 300 कर्मचाऱ्यांनी का रोखलं Air India Express चं उड्डाण? 10 मुद्यांमध्ये समजून घ्या पूर्ण प्रकरण )
 

सीट बेल्ट बांधले नसेल तर...

प्रवाशांनी सीट बेल्ट बांधली नसतील तर त्यांना टर्बुलेंसची झटके बसू शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं. सीट बेल्ट न घातलेल्या पॅसेंजरला कॉकपिटमध्ये धक्के बसतात. त्यामुळे तो जखमी होऊ शकतो. गेल्या वर्षी मे महिन्यात एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी विमानात एअर टर्बुलेंसचा प्रकार घडला होता. त्यामध्ये काही प्रवासी जखमी झाले होते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
इस्त्रायलचं टेन्शन, अमेरिकेचा शत्रू, 5000 विरोधकांना फाशी; कसं होतं इब्राहिम रईसींचं आयुष्य?
हवेत धोकादायक पद्धतीनं हलू लागलं विमान, सिंगापूर एअरलाईन्समध्ये घडला भयंकर प्रकार
bangladesh-mp-anwarul-azim-anar-murder-in-kolkata-west bengal
Next Article
भारतामध्ये उपचारासाठी आलेल्या बांगलादेशच्या खासदाराची हत्या
;