जाहिरात

पाकिस्तानच्या अणुबॉम्बचा पाया 1980 मध्ये उखडला असता? इंदिरा गांधींचा निर्णय 'लाजिरवाणा' माजी अधिकाऱ्याचा दावा

Pakistan Nuclear Program: पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाला सुरुवातीलाच थांबवण्यासाठी भारत आणि इस्रायलने मिळून 1980 च्या दशकात एक गुप्त हवाई हल्ला करण्याची योजना आखली होती.

पाकिस्तानच्या अणुबॉम्बचा पाया 1980 मध्ये उखडला असता? इंदिरा  गांधींचा निर्णय 'लाजिरवाणा' माजी अधिकाऱ्याचा दावा
Pakistan Nuclear Program: इंदिरा गांधी यांनी त्याला मान्यता दिली असती तर...
मुंबई:

Pakistan Nuclear Program: पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाला सुरुवातीलाच थांबवण्यासाठी भारत आणि इस्रायलने मिळून 1980 च्या दशकात एक गुप्त हवाई हल्ला करण्याची योजना आखली होती, असा खळबळजनक दावा एका माजी CIA अधिकाऱ्याने केला आहे. मात्र, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे, 'अनेक समस्यांचे समाधान' करण्याची संधी भारताने गमावली, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. रिचर्ड बार्लो नावाच्या या माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  हा हल्ला झाला असता, तर आज अनेक गोष्टी वेगळ्या असत्या.

Kahuta' प्रकल्पावर हल्ला करण्याची योजना काय होती?

रिचर्ड बार्लो हे 1980 च्या दशकात पाकिस्तानच्या गुप्त आण्विक हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेतील (CIA) काउंटरप्रोलिफरेशन अधिकारी होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये या अत्यंत गोपनीय योजनेला दुजोरा दिला आहे.

त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटानुसार,  पाकिस्तानमधील कहूटा (Kahuta) युरेनियम संवर्धन प्रकल्प (Uranium Enrichment Plant). हा प्रकल्प पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता. भारत आणि इस्रायलने मिळून पाकिस्तान अण्वस्त्रे बनवू नये यासाठी आधीच हल्ला (Preemptive Airstrike) करण्याची कथित योजना आखली होती.पाकिस्तान अण्वस्त्रे विकसित करून त्यांचा इराणला कधीही पुरवठा करु शकतो, अशी इस्रायलला भीती होती. 

( नक्की वाचा : फक्त एका ‘नाही' मुळे नेपाळ भारताबाहेर राहिले, अन्यथा आज...ऐतिहासिक सत्याची Inside Story )

बार्लो यांनी सांगितले की त्यांनी गुप्तचर वर्तुळात या योजनेबद्दल ऐकले होते, पण ते स्वतः या कारवाईत सामील नव्हते. त्यांनी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव मंजूर न केल्याबद्दल "It's a shame" (लाजिरवाणे) असे म्हणत खेद व्यक्त केला. त्यांच्या मते, यामुळे "a lot of problems" (अनेक समस्या) तेव्हाच सुटल्या असत्या.

अमेरिकेचा पेच आणि पाकिस्तानचे ब्लॅकमेल

बार्लो यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात अमेरिकेने या हल्ल्याला जोरदार विरोध केला असता, विशेषत: इस्रायलकडून हल्ला झाला असता तर. याचे कारण अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांना अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनविरुद्ध चालवलेल्या त्यांच्या गुप्त युद्ध प्रयत्नांवर (covert war effort) कोणताही परिणाम नको होता.

पाकिस्तानने अमेरिकेच्या या गरजेचा फायदा उचलला आणि एकप्रकारे 'ब्लॅकमेल' म्हणून वापर केला. पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे (PAEC) माजी प्रमुख मुनीर अहमद खान यांनी अमेरिकी खासदारांना (उदा. स्टीफन सोलरझ) इशारा दिला होता की, जर अमेरिकेने पाकिस्तानला मिळणारी मदत थांबवली, तर ते अफगाणिस्तानमधील सहकार्य थांबवतील.

( नक्की वाचा  : Gopal Patha : 'Bengal Files'मधील ‘तो' चेहरा; 1946 च्या हिंसाचारात कलकत्ताचे तारणहार ठरलेले ‘गोपाळ पाठा' कोण? )

बार्लो यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान मुजाहिदीनला मिळणाऱ्या गुप्त मदतीचा प्रवाह एकप्रकारे ब्लॅकमेल म्हणून वापरत होता. मुनीर खान यांचा इशारा होता की, "जर तुम्ही मदत थांबवली, तर आम्ही यापुढे मुजाहिदीनला समर्थन देणार नाही."

हा कहूटा प्रकल्प नंतर पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मितीमध्ये मध्यवर्ती ठरला. हा प्रकल्प पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक आणि मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवणारे (prolific proliferator) ए. क्यू. खान (AQ Khan) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला होता. याच प्रकल्पाच्या यशामुळे पाकिस्तानने 1998 मध्ये त्यांची पहिली अणुचाचणी यशस्वी केली आणि तो एक अणुशक्ती असलेला देश बनला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com