
- Benjamin Netanyahu faced a mass walkout during his UN General Assembly speech in New York
- Netanyahu vowed to continue the war on Gaza and urged Hamas to lay down arms
- His speech was broadcast in Gaza and streamed via hacked cell phones of residents
न्यूयॉर्क : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणादरम्यान अनेक देशांच्या प्रतिनिधींनी सभागृहातून मास वॉकआऊट केला. त्यामुळे त्यांना रिकाम्या खुर्च्यासमोर भाषण करावं लागलं. गाझामध्ये हमासविरुद्धचे युद्ध सुरूच ठेवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांना टाळ्या आणि घोषणा अशा संमिश्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. नेतन्याहू यांनी इस्रायलला हमासच्या विरोधातील 'काम पूर्ण करावेच लागेल' असे ठामपणे सांगितले.
आपले भाषण गाझामध्ये असलेल्या इस्रायली ओलिसांना ऐकू यावे यासाठी लाऊडस्पीकरद्वारे प्रसारित केले जात असल्याचे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. नेतन्याहू यांनी ओलिसांना संदेश देताना म्हटले, "आम्ही तुम्हाला एका सेकंदासाठीही विसरलेलो नाही. इस्रायलचे लोक तुमच्यासोबत आहेत. तर, हमासला इशारा देताना ते म्हणाले, तुमची शस्त्रे खाली ठेवा. माझ्या लोकांना जाऊ द्या. तुम्ही असे केल्यास, तुम्ही जिवंत राहाल. जर नाही केले, तर इस्रायल तुमचा शोध घेऊन तुम्हाला संपवेल. पुढे त्यांनी 'पाश्चिमात्य नेते दबावाखाली झुकले असतील, पण इस्रायल झुकणार नाही,' अशी ग्वाही दिली.
(नक्की वाचा- USA H-1B Visa: अमेरिकेला सोडा आता 'हे' 5 देश आहेत वर्क व्हिसासाठी चांगले पर्याय, मिळेल बक्कळ पगार)
❗Netanyahu visibly SHAKEN as majority of UN delegates STORM out of General Assembly hall — 'Please ORDER in the hall' https://t.co/JGrjGIN8bR pic.twitter.com/7c4IVf8Lnx
— RT (@RT_com) September 26, 2025
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेस्ट बँक ताब्यात घेण्यासंबंधी इस्रायलच्या भूमिकेला विरोध केला आहे. ट्रम्प म्हणाले, "मी इस्रायलला वेस्ट बँक ताब्यात घेण्याची परवानगी देणार नाही. नाही, मी तसे करू देणार नाही. आता खूप झाले आहे, हे थांबण्याची वेळ आली आहे." या विधानामुळे इस्रायलच्या धोरणाला अमेरिकेकडूनही एक प्रकारे लगाम घालण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Plane landing gear : विमानाच्या चाकामध्ये लपून काबुलहून दिल्लीला पोहोचला, सर्वजण हैराण, जिवंत कसा वाचला?)
युद्ध गुन्हेगारीच्या आरोपांचा सामना
नेतन्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री योआव गॅलेंट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाकडून युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांचा सामना करत आहेत. त्यामुळे नेतन्याहू यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर आपली बाजू मांडण्याची ही एक मोठी संधी होती. या भाषणादरम्यान संयुक्त राष्ट्रापासून काही अंतरावर पॅलेस्टाईन समर्थक आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world