जाहिरात
Story ProgressBack

33 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला Microsoft नं एका झटक्यात काढलं! म्हणाला...

Microsoft employee fired after 33 years : बोगडान यांनी Linkedln वर एक पोस्ट  लिहून हा सर्व अनुभव शेअर केलाय. 

Read Time: 2 min
33 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला Microsoft नं एका झटक्यात काढलं! म्हणाला...
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

कोणत्याही कंपनीत काही वर्ष काम केल्यानंतर ती सोडणं हा काहीसा अवघड प्रसंग असतो. एकाच ठिकाणी रोज काम केल्यानं झालेला मित्रपरिवार, ऑफिसमधील सवयीचं वातावरण, जम बसलेलं काम हे सोडून नव्या ठिकाणी जाताना कोणताही कर्मचारी विचार करतोच. बदलत्या काळात जागतिक मंदीचं कारण देत अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सक्तीनं घरी पाठवलं आहे.

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या बलाढ्य आयटी कंपनीत 33 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावरही ही वेळ आली. त्यांना कंपनीनं एका झटक्यात काढून टाकलं. 3 दशकांपेक्षा जुनी नोकरी गमावल्यानंतर या कर्मचाऱ्यानं या प्रसंगाबद्दलचं मन मोकळं केलं आहे.

जेफ बोगडान (Jeff Bogdan) असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते मायक्रोसॉफ्टच्या लर्निंग अँड डेव्हलपमेंट (L & D) विभागाचे संचालक होते. कंपनीच्या एचआरकडून हब आणि स्पोक मॉडेलचा वापर करण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांना नोकरी गमवावी लागली. बोगडान यांनी Linkedln वर एक पोस्ट  लिहून हा सर्व अनुभव शेअर केलाय. 

मायक्रोसॉफ्टमधील 33 वर्षांचा माझा प्रवास मला नोकरीवरुन काढल्यानं फेब्रुवारी महिन्यात संपला. माझे शेवटचे दोन आठवडे सारवासारव करण्यात गेले. त्यानंतर मी अर्धा वेळ कुटुंबासोबत आणि अर्धा वेळ एकटा चिंतनात घालवला. 

माझी मायक्रोसॉफ्टमधील संपूर्ण कारकिर्द अविश्वसनीय आहे. 'विंडोज फोन, झ्यून आणि विंडोज 95' या तीन प्रॉडक्टसा मला नेहमी अभिमान असेल. त्याचबरोबर कंपनीतील गेली दोन वर्ष माझ्यासाठी खूप कसोटीची होती. त्याकाळात माझ्यावर लर्निंग अँड डेव्हलपमेंट विभागातील जबाबदारी पार पाडली. 'सर्व काही शिका' या कंपनीच्या तत्वाचं पालन केल्यानंतर 'सारं काही शिकवा' या तत्वाचा प्रसार करण्याची वेळ आली होती, असा माझा तर्क होता.'

'मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका'; कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने सुरू केली Unhappy Leave!

त्यानंतर बोगडेन यांनी त्यांना नोकरीवरुन का काढलं? याचं कारण सांगितलं. 'एन अँड डी च्या जागी हब आणि स्पोक हे मॉडेल एचआरनं स्विकारल्यानं मला नोकरी गमवावी लागली,' असं त्यांनी सांगितलं. 

Latest and Breaking News on NDTV

बोगडेन यांनी 15 एप्रिल रोजी ही पोस्ट लिहली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination