जाहिरात

Microsoft ने पाकिस्तानातील दुकान बंद केले, 9 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

Microsoft closes its Pakistan office: मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे माजी संस्थापक कंट्री मॅनेजर जवाद रेहमान यांनी LinkedIn वर पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे.

Microsoft ने पाकिस्तानातील दुकान बंद केले, 9 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ
Microsoft closes its Pakistan office: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
मुंबई:

Microsoft closes its Pakistan office: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने जागतिक स्तरावर कर्मचारी कपात आणि व्यवसाय रणनीती बदलण्याच्या योजनेचा भाग म्हणून पाकिस्तानातील आपले मर्यादित कार्यालय बंद करण्याची घोषणा केली. गुरुवारी २५ वर्षांच्या कार्यकाळानंतर हे कार्यालय बंद करण्यात आले. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे.

2023 नंतरची सर्वात मोठी कर्मचारी कपात

मायक्रोसॉफ्टने आपली कार्यपद्धती क्लाउड-आधारित आणि स्थानिक भागीदारांवर केंद्रित मॉडेलकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच कंपनीने जागतिक स्तरावर सुमारे 9100 कर्मचाऱ्यांना (कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या 4 टक्के) कमी केले आहे. ही 2023 नंतरची सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे.

( नक्की वाचा: दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टी स्वस्त होणार, लवकरच होणार मोठे बदल )

मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे माजी संस्थापक कंट्री मॅनेजर जवाद रेहमान यांनी सरकार आणि आयटी मंत्र्यांना ठोस उद्दिष्टांवर आधारित (KPI-driven) योजना तयार करून तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले. त्यांनी लिंक्डइनवर लिहिले की, “मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक कंपन्यांना देखील पाकिस्तानात व्यवसाय टिकवणे अशक्य वाटत आहे, हे सध्याच्या व्यावसायिक वातावरणाचे द्योतक आहे.”

( नक्की वाचा:  जुलैपासून पॅन कार्डच्या नियमात मोठा बदल होणार, ही माहिती तुम्हाला असलीच पाहीजे )

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही एक्सवर पोस्ट करत या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “हा आपल्या आर्थिक भवितव्यासाठी चिंताजनक संकेत आहे.” त्यांनी दावा केला की, मायक्रोसॉफ्टने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात विस्ताराचा विचार केला होता, परंतु देशातील अस्थिरतेमुळे 2022 च्या अखेरीस कंपनीने व्हिएतनामची निवड केली. “ही संधी आपण गमावली,” असे त्यांनी लिहिले.

जवाद यांनी स्पष्ट केले की, मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानात पूर्ण व्यावसायिक केंद्र उभारले नव्हते. त्याऐवजी, कंपनीकडे उद्योग, शिक्षण आणि सरकारी ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणारी संपर्क कार्यालये होती. गेल्या काही वर्षांत यापैकी बहुतांश काम स्थानिक भागीदारांकडे हस्तांतरित झाले आहे, तर परवाना आणि करारांचे व्यवस्थापन युरोपमधील आयर्लंड येथील केंद्रातून केले जाते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com