जाहिरात

Middle East Alert: युद्धादरम्यान आखाती देशांवर महासंकट, अनेक ठिकाणे पाण्याखाली जाणार? विमानतळ हाय अलर्टवर

पर्शियन आखातावर निर्माण झालेल्या 'कट-ऑफ लो प्रेशर सिस्टम'मुळे मध्यपूर्वेतील 7 देशांमध्ये भीषण पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवघ्या 3 दिवसांत संपूर्ण वर्षाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Middle East Alert: युद्धादरम्यान आखाती देशांवर महासंकट, अनेक ठिकाणे पाण्याखाली जाणार? विमानतळ हाय अलर्टवर

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीच्या सावटाखाली असतानाच आता या देशांसमोर एक मोठे नैसर्गिक संकट उभे ठाकले आहे. पर्शियन आखातावर (Persian Gulf) एक अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी चक्रीवादळ घोंगावत असून, यामुळे संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरब आणि ओमानसह सात देशांना निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हा केवळ मान्सूनचा बदल नसून एक धोकादायक 'कट-ऑफ लो प्रेशर सिस्टम' आहे, ज्यामुळे वाळवंटात भीषण पूर आणि चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

3 दिवसांत 500 मिमी पावसाचा धोका

या वादळाची सर्वात भयावह बाब म्हणजे पुढील 72 तासांत काही भागांत 100 मिमी ते 500 मिमी पाऊस होऊ शकतो. ज्या देशांमध्ये वर्षभरात जेमतेम 100 मिमी पाऊस पडतो, तिथे एकाच दिवसात एवढा पाऊस होणे म्हणजे प्रलयाची घंटा आहे. अचानक येणारा पूर , रस्ते जलमय होणे यामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होऊ शकते. सौदी अरब आणि येमेनमध्ये धुळीची वादळे आणि 'डेझर्ट टॉरनेडो' उठण्याची भीती आहे.

(नक्की वाचा-  Cylinder Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले? केंद्र सरकारने परिपत्रक जारी करत स्पष्ट सांगितलं)

दुबईवर पुन्हा 2024 सारखे संकट?

एप्रिल 2024 मध्ये दुबईने 75 वर्षांतील सर्वात भीषण पाऊस पाहिला होता. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुबई इंटरनॅशनल आणि अबू धाबी विमानतळावर उड्डाणे डायव्हर्ट करण्याची तयारी सुरू आहे. या आठवड्यात 3 ते 6 इंच पाऊस होऊ शकतो, जो दुबईच्या वार्षिक सरासरीपेक्षा जास्त आहे. वाळवंटी शहरांमधील ड्रेनेज सिस्टिम (पाणी निचरा यंत्रणा) एवढा मोठा पाऊस झेलण्यासाठी तयार नसल्यामुळे शहरांमध्ये पाणी साचण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल.

युद्धाच्या पातळीवर तयारी

या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आखाती देशांच्या सरकारांनी कंबर कसली आहे. यूएई, ओमान आणि सौदीमध्ये आपत्कालीन यंत्रणांना 'स्टँडबाय'वर ठेवण्यात आले आहे. कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याच्या सूचना आहेत. अबू धाबीमध्ये रस्त्यांवरील वाहनांची गती मर्यादित करण्यात आली असून, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

(नक्की वाचा-  Alcohol Prices to Rise: मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री! बिअर आणि दारुच्या किमती वाढणार? काय आहे कारण?)

जुन्या जखमा ताज्या

2019 मध्ये इराण आणि इराकने अब्जावधी डॉलर्सचे नुकसान सोसले होते.
2022 मध्ये अवघ्या 6 तासांत 179 मिमी पाऊस पडल्याने जेद्दाह शहरात हाहाकार माजला होता.
2020 मध्ये इजिप्तपासून इराणपर्यंत 9 देशांना वादळाचा तडाखा बसला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com