
प्रांजल कुलकर्णी, नाशिक: गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड सुरु आहे. शेअर मार्केटमधील या घसरणीमुळे छोट्या मोठ्या गुंतवणुकदारांना आपल्या कष्टाचे पैसे गमावलेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहेत. अशातच शेअर मार्केटमध्ये तब्बल 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने नाशिकमधील एका तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेअर्स मार्केटमध्ये तब्बल 15 लाखांचा फटका बसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका 30 वर्षीय युवकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये तीन दिवसांपूर्वी समोर आली होती. पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
मयत रवींद्र शिवाजी कोल्हे हा मुळचा चांदवड तालुक्यातील विटाई गावचा रहिवासी असून सध्या तो नाशिकच्या खुटवडनगर परिसरात राहत होता. एका बँकेत तो कामाला असून आपल्याला मिळणारे पैसे तो आई वडीलांकडे न देता शेअर्स मार्केटमध्ये तो गुंतवणूक करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरत होत असल्याने त्याचे सुमारे 15 लाख रूपयांचे नुकसान झाले हाेते.
(नक्की वाचा- Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)
दरम्यान, शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानामुळे आई - वडीलांनाही आपण फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने त्याने पिंपळगांव बहुला येथील ज्याेती विद्यालयाच्या माेकळ्या मैदानावर दुचाकीवर बसून स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेत आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world