जाहिरात

Mobile Stolen Video: झपकन आला, गपकन गेला; लाईव्हसाठी उभ्या पत्रकाराच्या हातून मोबाईल खेचला

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

Mobile Stolen Video: झपकन आला, गपकन गेला; लाईव्हसाठी उभ्या पत्रकाराच्या हातून मोबाईल खेचला
Cops are hunting for the attempted thief.
  • Brazilian reporter Clara Nery narrowly escaped a robbery attempt while going live on air
  • A man on a motorbike tried to snatch her phone but dropped it and fled the scene
  • Nery recovered her phone and shared the incident on Instagram, seeking public help
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

ब्राझीलमध्ये लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना एका टीव्ही रिपोर्टरचा मोबाईल चोरण्याचा एका चोरट्याने प्रयत्न केला.  ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. पीपल मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलियन नेटवर्क बँड रिओची रिपोर्टर क्लारा नेरी रिओ डी जनेरियोतील एका रस्त्यावर लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी तयारीत उभी होती. थेट प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वी मोबाईल पाहात असताना एका चोराने अवघ्या एका सेकंदात तिचा मोबाईल उडवला. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

व्हिडिओमध्ये हा चोर मोटरसायकलवरून रिपोर्टरच्या जवळून जात असताना तिच्या हातातून फोन हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसला. मात्र, त्याचा प्रयत्न फसला आणि तो घटनास्थळावरून लगेच पळून गेला. नेरी हिने म्हटलंय की, चोरट्याने तिचा फोन खेचला खरा मात्र खेचल्यानंतर तो नीट पकडता न आल्याने रस्त्यातच पडला. यामुळे नेरीला तिचा मोबाईल परत मिळाला. या घटनेची माहिती देण्यासाठी तिने  इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने म्हटलंय की"लाईव्ह जाण्यापूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने काही वाईट घडले नाही. "

Watch the video below: 

या घटनेनंतर नेरी हिने तिला मदत करणाऱ्यांचे आभार मानले. "माझ्या सहकाऱ्यांनी, पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानते." असं नेरीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ज्या चोराने तिचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला, त्या चोराची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी मदत करावी असे आवाहनही तिने केले आहे. हा मोबाईल चोर ज्या बाईकवरून आला होता त्या बाईकचा नंबर त्याने पुठ्ठ्याने झाकला होता. पोलिसांनी सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून ते या चोराला शोधून काढण्यासाठी अधिकचा तपास करत आहेत.  

क्लारा नेरी हिने पोलिसांचं कौतुक केलं खरं मात्र त्याचवेळी तिने एक चिंताही व्यक्त केली. तिने म्हटले की माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते चोराला शोधून काढतील याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र अटकेनंतर त्याला तो किती काळ कोठडीत राहतो हे बघावं लागेल. कारण अनेक प्रकरणांमध्ये अटकेनंतर आरोपी काही तासांतच सुटतात.  

द नाइटलीने एक माहिती प्रसिद्ध केली आहे. यासाठी त्यांनी रिओ डी जनेरियो पब्लिक सिक्युरिटी इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीची मदत घेतली आहे. द नाइटलीने म्हटलंय की  2024 च्या तुलनेत जून 2025 मध्ये रिओ डी जनेरियोमध्ये फोन चोरीच्या घटनांमध्ये 27% वाढ झाली आहे. जून 2025 मध्ये 2,300 पेक्षा जास्त फोन चोरीला गेले, तर मागील वर्षी याच महिन्यात हा आकडा 1,808 होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com