जाहिरात

Operation Sindoor : भारताच्या हल्ल्यात झालेल्या नाचक्कीची पाकिस्तानकडून पहिल्यांदा कबुली, 11 सैनिक ठार तर....

Operation Sindoor : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं असल्याची कबुली पाकिस्ताननं पहिल्यांदाच दिली आहे.

Operation Sindoor : भारताच्या हल्ल्यात झालेल्या नाचक्कीची पाकिस्तानकडून पहिल्यांदा कबुली, 11 सैनिक ठार तर....
मुंबई:

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. या कारवाईत पाकिस्तानमधील 9 ठिकाणचे दहशतवादी अड्डे नष्ट झालं. त्यानंतर पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याच्या मार्फत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतानं हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्करचंही मोठं नुकसान केलं आहे. भारतीय सैन्याकडून याबबतचे पुरावे जगाला देण्यात आले आहेत. पण, पाकिस्तानकडून मात्र या कारवाईमध्ये आपलं सैन्य सरस ठरल्याचा खोटा प्रचार सुरु होता. पण, अखेर हा खोटा प्रचार रेटणे पाकिस्तानला अशक्य झाले आहे. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं असल्याची कबुली पाकिस्ताननं पहिल्यांदाच दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाकिस्ताननं काय मान्य केलं?

भारतानं केलेल्या लष्करी कारवाईत 11 लष्करी जवानांचा मृत्यू झाला तर 78 जण जखमी झाल्याचं पाकिस्ताननं मंगळवारी (13 मे)  मान्य केलं. या मृतांमध्ये एक एक स्क्वाड्रन लीडरचाही समावेश आहे.

पाकिस्तानी लष्करानं याबाबतचं एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यामध्ये त्यांनी 6 आणि 7 मे च्या रात्री भारतानं केलेल्या हल्ल्यात 40 पाकिस्तानी नागरिक ठार तर 121 नागरिक जखमी झाल्याचा दावा केला आहे. 

पाकिस्तान हवाई दलाच्या मृत कर्मचाऱ्यांमध्ये स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ, चीफ टेक्निशियन औरंगजेब, सीनियर टेक्निशियन नजीब, कॉर्पोरल टेक्निशियन फारूक आणि सीनियर टेक्निशियन मुबाशीर यांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीबाबत माहिती देण्यात आलेली नाही.नाईक अब्दुल रहमान, लान्स नाईक दिलावर खान, लान्स नाईक इकरामुल्ला, नाईक वकार खालिद, सिपाही मुहम्मद अदील अकबर आणि सिपाही निसार हे लष्करातील मृत जवान आहेत, असं पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story

( नक्की वाचा :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story )

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तान लष्कराने भारताबरोबरच्या संघर्षात त्यांच्या एका लढाऊ विमानाचं 'थोडेसे नुकसान' झाल्याचं कबुल केलं होतं. मात्र त्याबाबत अधिक माहिती दिली नव्हती.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी सोमवारी रावळपिंडी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन जखमी जवानांची आणि नागरिकांशी चर्चा केली. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही लाहोरमधील मिलिटरी हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जखमी झालेल्या अधिकाऱ्यांची विचारपूस केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com