भारतीय रेल्वेमधील (Indian Railway) अपुऱ्या सोयी-सुविधांबद्दल आपण कायम तक्रारी करीत असतो. अस्वच्छ बोगी, घाणेरडं बाथरूम, उशीराने धावणारी रेल्वे, एक्स्प्रेसमध्ये मिळणारं बेचव जेवण... अशी मोठीच्या मोठी यादीच आपल्याकडे असते. मात्र अनेकदा प्रवाशांची चिंधीगिरीही पाहायला मिळते. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
patna_edits1 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका उच्चभ्रू घरातील प्रवाशाने एक्स्प्रेसमधील टॉवेल, ब्लँकेट चोरी केल्या. स्वत: रेल्वेच्या कर्मचाऱ्याने हा सर्व प्रताप उघड केला आहे. प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात आली आणि प्रवाशाच्या बॅगेतून टॉवेल, ब्लँकेट बाहेर काढण्यात आले. केवळ एक नाही तर प्रवाशाने चार ते पाच टॉवेल आपल्या बॅगेत भरल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हे प्रवासी एका चांगल्या घरातील असल्याचं दिसत आहे.
ही घटना दून एक्स्प्रेसमधील आहे. या व्हिडिओवरुन दरवर्षी रेल्वेला किती मोठ्या संख्येने अतिरिक्त खर्च करावा लागत असेल याची कल्पना येते. या व्हिडिओवरील कमेंटमध्ये लोकांनी तपासणी करणाऱ्यांचं कौतुक केलं आहे.
चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नियमित तपासणी केली जावी अशा प्रकारच्या कमेंट येत आहेत. याच कारणामुळे रेल्वे टॉयलेटमधील मग साखळीने बांधत असल्याची कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world