डॉक्टर महिला असो की पुरुष रुग्णासाठी केवळ चांगले उपचार मिळणे गरजेचे असतात. त्यामुळे रुग्ण देखील उपचार घेण्याआधी डॉक्टर महिला आहे की पुरुष आहे याबाबत फार विचार करत नाहीत. मात्र पुरुष डॉक्टरांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केलेल्या रुग्णांचा मृत्यूदर आणि पुन्हा रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. अॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनच्या संशोधनातून याबाबतची माहिती समोर आली आहे.
या संशोधनात जवळपास ७ लाख ७६ हजार रुग्णांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. यामध्ये ४ लाख ५८ हजार १०० महिला रुग्ण होते. तर ३ लाख १८ हजार ८०० पुरुष रुग्ण होते. या सर्व रुग्णांवर २०१६ ते २०१९ या कालावधीत रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
नक्की वाचा- कमी झोपेमुळे 'Silent Epidemic' चा धोका, काय आहे हा आजार?
ज्या रुग्णांवर महिला डॉक्टरांनी उपचार केले, त्यांचं मृत्यूचं प्रमाण कमी होते. याशिवाय एकदा उपचार झालेल्या रुग्णांचं पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी होतं. महिला डॉक्टरांनी उपचार केलेल्या महिला रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी ८.१५ टक्के होती. तर पुरुष डॉक्टरांनी उपचार केलेल्या महिला रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी ८.३८ टक्के होती.
तर महिला डॉक्टरांनी उपचार केलेल्या पुरुष रुग्णांच्या मृ्त्यूची टक्केवारी १०.१५ टक्के होती. तर पुरुष डॉक्टरांनी उपचार केलल्या पुरुष रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी १०.२३ टक्के होती.
नक्की वाचा- वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होतेय? 5 उपाय करा, सर्व काही होईल फर्स्ट क्लास
काय आहेत कारणे?
संशोधक युसुके त्सुगावा यांच्या म्हणण्यानुसार, महिला डॉक्टर उपचारादरम्यान गुणवत्तेवर खास लक्ष देतात. हेच कारण आहे की महिला डॉक्टरांकडून रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. महिला डॉक्टर आपल्या रुग्णांशी जास्तीत जास्त संवाद साधतात, त्यांच्या प्रकृतीच्या सुधारणेकडे लक्ष ठेवून असतात, तसेच त्यांच्या हालचालींवर देखील बारीक लक्ष ठेवून असतात.
महिला डॉक्टर रुग्णांसोबत जास्त वेळ घालवतात
आणखी एक संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर रुग्णांसोबत सरासरी २३ मिनिट वेळ घालवतात. तर पुरुष डॉक्टर रुग्णांसोबत सरासरी २१ वेळ घालवतात. हीच काही कारणे आहेत, जी रुग्णांच्या चांगल्या उपचारासाठी महिला डॉक्टरांना उजवे ठरवतात.