जाहिरात
Story ProgressBack

वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होतेय? 5 उपाय करा, सर्व काही होईल फर्स्ट क्लास

स्मरणशक्ती वाढवण्याचे (Brain Power) 5 उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुमची मेंदूची कार्यक्षमता वाढेल.

Read Time: 2 min
वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होतेय?  5 उपाय करा, सर्व काही होईल फर्स्ट क्लास
मुंबई:

How to boost brain power:  रोज सकाळी बदाम खाल्ले तर स्मरणशक्ती वाढते हे तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. पण, वाढत्या वयानुसार मेमरी लॉस (Memory Loss) होऊ लागतो. तुम्हालाही हा त्रास जाणवत असलेल तर स्मरणशक्ती वाढवण्याचे (Brain Power) 5 उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुमची मेंदूची कार्यक्षमता तर वाढेलच त्याचबरोबर तुम्ही सदृढ आणि निरोगी आयुष्य (Fit Life) जगाल.

व्यायाम

रोज व्यायाम केल्यानं शरीरातील रक्तप्रवाह योग्य पद्धतीनं काम करतो. डोक्यापर्यंत ऑक्जिन पोहचवण्याचं काम रक्तामधून होत असते. रोज व्यायाम केल्यानं काम करण्याची क्षमता वाढते. तुम्ही योगा, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग यासारखे वर्कआऊट करु शकता.

ध्यान
ध्यान केल्यानं तणाव कमी होतो. मन शांत होते आणि स्मरणशक्ती वाढते. मेंदू काम करण्याची क्षमताही यामुळे वाढू शकते. सकाळी कोणत्याही मोकळ्या जागेवर बसून ध्यान करावे.

शिस्तबद्ध आयुष्य

ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी शिस्तबद्ध आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. वेळेवर झोपणे, सकाळी लवकर उठणे, रोज चालणे, हेल्दी वर्क आऊट या गोष्टींचा दिनचर्येत समावेश हवा. त्याचा फायदा देखील स्मरणशक्ती वाढवण्यात होतो. 

योग्य आहार

ब्रेन पॉवर आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मासे नक्की खा. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑईल, नट्स, जीवनसत्व, मिनरल्स यांचाही आहारात समावेश हवा. अल्कोहल, तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन टाळा

तणावापासून दूर रहा

ताण-तणावांचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवरही प्रभाव पडतो. ताण कमी करण्यासाठी तुम्हाला आनंद मिळेल त्या गोष्टी करा. ताण कमी करण्यासाठी एखादा छंद जोपासा. त्यामधूनही तुम्हाला आनंद मिळेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination