
Scary Person On Rent : दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण उद्धवस्त झाल्यानंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेणारा देश अशी जपानची ओळख आहे. जपान नेहमीच तंत्रज्ञान, नवनवीन शोध आणि विचित्र सेवांनी जगाला नेहमीच आश्चर्यचकित करत असतो. यावेळी जपानमध्ये सुरु झालेल्या एका नव्या उद्योगानं सर्वांना धक्का दिला आहे. अशा प्रकारेही व्यवसाय करता येतो, हे जपानने दाखवून दिले आहे.
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट' (SCMP) नुसार, जपानमधील 'रेंटल क्वाहितो' (Rental Kowaihito) नावाच्या कंपनीने लोकांमध्ये होणारे वाद मिटवण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. ही कंपनी लोकांना भाड्याने 'कायदेशीर गुंड' देते. हे लोक दिसायला खूपच भयंकर (Scary Person On Rent) असतात. थोडे पैसे खर्च करून भाड्याने मिळणारे हे लोक, तुमचा वाद अर्ध्या तासात पूर्णपणे मिटवून टाकतात.
काय आहे व्यवसाय? (Japanese Company Intimidating Scary Person)
जपानी कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार हे भयंकर लोक टक्कल असलेले आणि शरीरावर मोठे-मोठे टॅटू असलेले असतात. त्यांना पाहून समोरची व्यक्ती आपोआप घाबरून जाते. या भयंकर लोकांना ग्राहकासोबत पाठवले जाते आणि ते फक्त अर्ध्या तासात संपूर्ण समस्या सोडवतात.
शेजाऱ्याशी वाद असो किंवा कंपनीतील कोणताही वाद, हे लोक लहान-लहान किंवा मोठे-मोठे वाद मिटवूनच थांबतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, लोक या सेवेचा वापर शेजाऱ्यांना शांत करण्यासाठी, ऑफिसमधील उद्धट कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी, किंवा धोका देणाऱ्या पार्टनरला सरळ करण्यासाठी करतात. एवढेच नाही तर, जर एखाद्या कंपनीच्या बॉसने तुमचा पगार रोखून धरला असेल, तर हे भयंकर लोक तुम्हाला पूर्णपणे मदत करू शकतात. कंपनीने दावा केला आहे की त्यांच्या या सेवेतील सर्व गोष्टी कायदेशीर आहेत. तसेच, ' हे भयंकर लोकं गुंड नाहीत,' असा दावाही या कंपनीनं केला आहे.
( नक्की वाचा : 'हा टीसी असेल तर रोज प्रवास करेन...', शताब्दी एक्सप्रेसच्या हँडसम TTE वर महिला फिदा; VIDEO VIRAL )
किती शुल्क आकारले जाते? (Japanese Company Scary Person Rent Charge)
या सेवेचा लाभ घेण्यासाठी लोकांना 30 मिनिटांसाठी 20 हजार येन (सुमारे 12 हजार रुपये) खर्च करावे लागतात. 3 तासांपर्यंतच्या सेवेसाठी 30 हजार रुपये शुल्क आहे. ग्राहक शहराबाहेरील असेल तर त्याला प्रवासाचा खर्चही उचलावा लागेल. या सेवेवर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया. यावर एकाने लिहिले आहे, 'ही सेवा खूप फायदेशीर आहे'. दुसरा लिहितो, 'ही सेवा त्यांच्यासाठी चांगली आहे ज्यांचं लोकं कमकुवत समजून शोषण करतात'. आणखी एक लिहितो, 'समजा दोन्ही पक्षांनी भाड्याने असे भयंकर लोक बोलावले तर काय होईल?'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world