थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये स्कूल बस आग लागून झालेल्या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. स्थानिक अधिकारी आणि बचाव पथकाने याबाबतची माहिती दिली आहे.
थांयलंडचे परिवहन मंत्री सूरिया जुंगरुंगरुएंगकित यांनी माहिती दिली की, बसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असे 44 जण प्रवास करत होते. बँकॉकच्या उत्तर उपनगरातील पथुम थानी प्रांतात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
(नक्की वाचा- ऑनलाईन ऑर्डर, मग मर्डर! दीड लाखांच्या iPhone साठी डिलिव्हरी बॉयला संपवलं)
बसचा टायर फुटला आणि त्यानंतर बस दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर बसला आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बस शाळेच्या सहलीवरून परतत होती. बसमध्ये 3 ते 15 वर्षे वयोगटातील मुले होती. याशिवाय त्याच्यासोबत 5 शिक्षकही प्रवास करत होते.