लहान मुलांना मोबाईलची लागलेली सवय हा भारतातच नव्हे तर जगभरातील चिंतेचा विषय आहे. लहान मुले तासंतास मोबाईलवर वेळ घालवतात. त्यांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात ते मोबाईलच्या आहारी जात आहेत. याचा मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. मुलांच्या भवितव्यासाठी आता ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियी बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटलं की, टेक कंपन्या लहान मुलांच्या सुरक्षेबाबत आवश्यक पावले उचलण्यात अशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने आता पाऊल उचलले आहे. हा निर्णय पालकांसाठी आहे. सोशल मीडियावरमुळे लहान मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी काही ठोक निर्णय घेणे आवश्यक होते.
(नक्की वाचा- 'झोमॅटो बॉय' किती पैसे कमावतात?, Viral Video पाहून इमोशनल व्हाल)
अँथनी अल्बानीज यांनी देखील जोर दिला की, मुलांना त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया वापरू इच्छितात, त्यांना तसे करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सोशल मीडिया कंपन्यांनी मुलांना सोशल मीडियावर प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी अॅडव्हान्स तयारी करावी, जेणेकरून हा कायदा लागू होताच त्याचे पालन करता येईल. यामध्ये प्लॅटफॉर्मना त्यांची धोरणे आणि तंत्रज्ञान अपडेट करावे लागेल, जेणेकरून ते मुलांचे वय ओळखू शकतील आणि त्यांच्यावर बंधने घालू शकतील, असे पंतप्रधान अल्बानीज म्हणाले.
मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा परिणाम होणार आहे. यामध्ये Meta चे प्लॅटफॉर्म फेसबुक आणि Instagram, ByteDance चे TikTok आणि एलॉन मस्कचे X यांचा समावेश आहे. याशिवाय यूट्यूबचाही या यादीत होऊ शकते. या कंपन्यांकडून या निर्णयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये याची अंमलबजावणी कशी केली जाणार हे पाहावं लागेल.
(नक्की वाचा- VIDEO : दारुच्या नशेत लावली नको ती पैज, जिंकलाही पण नंतर घडलं भलतंच...)
याआधीही उचलली गेली पावले
गेल्या वर्षी फ्रान्सने देखील 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला होता. अमेरिकेत, 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पालकांची परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून मुलांचा डेटा संरक्षित केला जाईल आणि त्यांच्यासाठी सुरक्षित ऑनलाइन वातावरण सुनिश्चित करता येईल.
मुलांवर काय परिणाम होतो?
मुले सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने त्यांची शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्या वाढू शकतात. याशिवाय सोशल मीडियावर तुलना करण्याची भावना, नकारात्मक कमेंट्स आणि सायबर गुंडगिरी यासारख्या समस्या मुलांवर मानसिक परिणाम करू शकतात.