
Sunita Williams Salary : सुनीता विल्यम्स NASA ची प्रसिद्ध अंतराळवीर. गेल्या नऊ महिन्यांपासून सुनीला विल्यम्स अंतराळात होत्या. या कालावधीत अनेकवेळा त्यांच्या परतीचा प्लान विविध कारणांमुळे रद्द झाला. अखेर त्या उद्या 19 मार्चला पृथ्वीवर परतण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सध्या Sunita Williams Homecoming हे देखील ट्रेंड करीत आहे. नुकतच त्यांचा पगार आणि नेटवर्थ चर्चेत आलं आहे. NASA कडून सुनीता विल्यम्स यांना किती पगार दिला जातो हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुनीला विल्यम्स नासासोबत काम करीत आहेत. यादरम्यान अनेकदा त्यांनी अंतराळ दौरा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनेकांचा असा समज आहे ही अंतराळात अडकलेल्या नासाच्या कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम मिळत असेल. मात्र प्रत्यक्षात असं नाही. द इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, त्यांना वर्षाला 1.26 कोटी पगार मिळतो. हे झालं भारतीय रुपयात. प्रत्यक्षात डॉलरमध्ये ही रक्कम कमी असेल असं म्हटलं जातं. NASA मध्ये सॅलरी ही ग्रेडनुसार ठरते. GS-13 ते GS-15 पर्यंतची सॅलरी 1 लाख ते 1.6 लाख डॉलरदरम्यान असते. सुनीता यांचा अनुभव पाहता त्या टॉप ग्रेडमध्ये आहेत.
नासा ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वोच्च अंतराळ संस्था आहे. ही संस्था अंतराळवीरांसाठी स्वप्न असतं. ही संस्था आपल्या अंतराळवीरांना अमेरिकन सरकारने ठरवून दिलेल्या वेतनश्रेणीच्या आधारे सॅलरी देते. अमेरिकेत GS-13 ते GS-15 पर्यंतची वर्गवारी केली आहे. सुनीता विल्यम्स G-15 च्या श्रेणीत येतात आणि नासाच्या रेकॉर्डनुसार, सुनीता विल्यम्स यांचं वार्षिक वेतन साधारण $152,258 (1,26,00,000 कोटी) असू शकतं.
नक्की वाचा - Spacex-NASA ISS Mission : अखेर 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्सची 'वापसी'; पृथ्वीवर कधीपर्यंत येतील?
सुनीता विल्यम्स यांना सॅलरीव्यतिरिक्त इतर अनेक सुविधाही मिळतात. नासा आपल्या अंतराळवीरांना पेन्शन आणि जीवन विमादेखील देते. सुनीताची नेटवर्थ 5 ते 7 मिलियन डॉलर असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच 41 ते 58 कोटींदरम्यान आहे. ही रक्कम त्यांचं वेतन, गुंतवणूक आणि नेव्ही सर्विसमधून मिळाली आहे. माजी नौसेना अधिकारी आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं नासा आणि अमेरिकेतील सैन्यासोबत चांगली करिअर ठरलं.
अंतराळात अडकल्यामुळे अतिरिक्त भत्ता किंवा बोनस मिळणार?
सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांना बोइंग स्टारलायनर मिशनसाठी पाठवण्यात आलं होतं. हे मिशन जून 2024 मध्ये सुरू झालं, मात्र तांत्रिक अडचणीमुळे हा मुद्दा 9 महिन्यांपर्यंत पोहोचला. मात्र सुनीता आणि बॅरी यांना अंतराळात अडकण्यासाठी कोणताही भत्ता मिळणार नाही. त्यांच्या वेतनात बदल होणार नाही. मिशनचा कालावधी वाढणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. मात्र मिशनमधील संकट पाहता त्यांना बोनस नक्कीच मिळू शकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world