अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांना बाजूला ठेवत सलग दुसऱ्या दिवशी इराणच्या मुख्य भूमीवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट आदेशानंतर इराणमधील अनेक लष्करी तळांना लक्ष्य करत हे "आत्मरक्षार्थ हल्ले" करण्यात आले आहेत. इराणच्या अनुचित आणि आक्रमक कारवायांना ठेचण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
इराणच्या अनेक शहरांमध्ये पुन्हा क्षेपणास्त्रे कोसळली
न्यूज एजन्सी एएफपीने (AFP) दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या या हल्ल्यांमुळे होर्मुज परिसरात प्रचंड स्फोट झाले आहेत. इराणचे बंदर अब्बास, केश्म द्वीप, मीनाब, कारगान आणि सीरिक शहरांमध्ये अमेरिकेची क्षेपणास्त्रे कोसळली असून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या हल्ल्यांमध्ये झालेल्या वित व वित्तहानीची अचूक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
इराणकडून 'होर्मुज' बंद
इराणने 'होर्मुजची सामुद्रधुनी' अधिकृतपणे बंद करत असल्याची घोषणा केली असून इथून कोणत्याही जहाजाला जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे. जो कोणी इथून जाण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर हल्ला केला जाईल, अशी धमकी इराणने दिली.
(नक्की वाचा- Hero Flex Fuel Bike: पेट्रोलपेक्षा 20 रुपये फ्लेक्स-फ्यूल बाईक किती परवडेल? जाणून घ्या संपूर्ण बचतीचे गणित)
युएस सेंटकॉमने (US CENTCOM) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत इराणचा दावा खोडून काढला. होर्मुजची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असून आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक सुरक्षितपणे सुरू आहे. तसेच अमेरिकेच्या कोणत्याही युद्धनौकेवर हल्ला झालेला नाही."
डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा
या भीषण हल्ल्यांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर "जोरदार हल्ला" करण्याचे संकेत दिले होते. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेली शांतता चर्चा आता पूर्णपणे रसातळाला गेली आहे. ट्रम्प यांनी आरोप केला की,"इराणचे वाटाघाटी करणारे प्रतिनिधी अमेरिकेला गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यांचा दृष्टिकोन सहकार्याचा नाही. दोन्ही पक्ष कराराच्या अत्यंत जवळ पोहोचले होते, मात्र इराणमुळे चर्चा वारंवार अडकत आहे. आम्ही कालही हल्ला केला होता आणि आज पुन्हा तोच दणका दिला आहे."
त्यातच अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी संकेत दिले आहेत की, हे हल्ले इथेच थांबणार नाहीत, तर तिसऱ्या रात्रीही यापेक्षा "मजबूत" आणि "स्पष्ट" हल्ले केले जाऊ शकतात.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)
फुटबॉल विश्वचषकावर सावट
अमेरिका आणि इतर देशांच्या यजमानपदाखाली लवकरच सुरू होणाऱ्या 'फुटबॉल विश्वचषका'च्या तोंडावर या युद्धाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चिंता वाढवली आहे. इराण देखील या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने या तणावाचा थेट परिणाम खेळावर होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world