
इस्रायल-इराण युद्धादरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन अनुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांना लक्ष्य केले. अमेरिके इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर हल्ला केला. यासाठी बी-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आला. बी-2 स्पिरिट हे अमेरिकेचे अत्याधुनिक स्टेल्थ बॉम्बर आहे, जे नॉर्थरॉप ग्रुम्मन कंपनीने बनवले आहे. हे विमान कमी दृश्यमान तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे ते शत्रूच्या रडारला सहज येत नाही.
बी-2 विमान शत्रूच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेत प्रवेश करून महत्त्वाची लक्ष्ये नष्ट करू शकते. 37 तासांहून अधिक काळ सतत उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. इराणवरील हल्ल्यांदरम्यान विमानाने लांबचा प्रवास करुन लक्ष्य गाठलं. यासाठी हवेत इंधन भरण्याची सुविधा वापरली गेली.
(नक्की वाचा- Iran Israel War: 'हा' देश इराणला अण्वस्त्रे देणार? युद्ध भडकणार, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?)
विमान आणि बॉम्बची किंमत
1988 ते 2000 दरम्यान 21 बी-2 विमाने बनवली गेली. मूळ योजना 132 विमानांची होती, पण शीतयुद्ध संपल्यानंतर आणि खर्चामुळे ही संख्या कमी करण्यात आली. प्रत्येक विमानाची किंमत सुमारे 2.13 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 19000 कोटी एवढी आहे. याशिवाय या विमानातून इराणमध्ये हल्ल्यासाठी वापरलेले 13600 किलोचे GBU 57 बंकर बस्टर बॉम्बची किंमत 173 प्रति बॉम्ब आहे.
विमानाचं खास डिझाईन
बी-2 चं डिझाईन एका फ्लाइंग विंग सारखी आहे, ज्यामुळे त्याचा आकार पारंपरिक विमानासारखा नसतो. यामुळे रडार सिग्नल्स परावर्तित होण्याची शक्यता कमी होते. विमानाची लांबी 69 फूट (21 मीटर), पंखांचा विस्तार 172 फूट (52.4 मीटर), उंची 17 फूट (5.2 मीटर), वज: सुमारे 72,575 किलो आणि पूर्ण लोडसह 152,635 किलो एवढी विमाची क्षमता आहे.
बी 2 विमानाचा वेग हाय सबसॉनिक 1,010 किमी/तास आहे. यात सुपरसॉनिक क्षमता नाही, कारण स्टेल्थवर जास्त भर दिला गेला आहे. विमान कमाल 50,000 फूट (15,000 मीटर) उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. एकदा इंधन भरल्यानंतर ही विमान 11,100 किमी प्रवास करु शकते. तर एकदा हवेत इंधन भरल्यास विमान 19,000 किमी प्रवास करु शकते.
(नक्की वाचा- US attacks Iran : आताची मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर Air Strike; 3 आण्विक तळं उद्धवस्त)
विमानाची शस्त्रास्त्र क्षमता
शस्त्रास्त्रे आणि पेलोड क्षमतेचा विचार केला तर B2 विमानाची पेलोड क्षमता 18,000 किलो पेक्षा जास्त आहे. तर पारंपरिक शस्त्रे, अण्वस्त्रे, बंकर बस्टर बॉम्ब्स, इंटरनल व्हेपन्स बे अशी सर्व शस्त्रास्त्रे विमानाच्या आत ठेवली जातात. ज्यामुळे रडारवर दिसण्याची शक्यता कमी होते. विमानाचा आवाज आणि दृश्यमानता कमी करण्यासाठी विशेष डिझाईन वापरले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world