जाहिरात

हाडं वितळतात, 800 सेल्सियसपर्यंत वाढतं तापमान, काय आहे White Phosphorus ज्याचा इस्रायलनं केलाय वापर

What is White Phosphorus : इस्रायली सैन्यानं व्हाईट फॉस्फरसचा वापर केला असा आरोप मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी केलाय.

हाडं वितळतात, 800 सेल्सियसपर्यंत वाढतं तापमान, काय आहे  White Phosphorus ज्याचा इस्रायलनं केलाय वापर
मुंबई:

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील (Israel-Gaza War) दहशतवाादी संघटना हमास (Hamas) यांच्यात 7 ऑक्टोबर 2023 पासून युद्ध सुरु आहे. गाझा पट्टीमध्ये  (Gaza Strip) सुरु असलेल्या या युद्धात अन्य देशांनी देखील उडी मारलीय. लेबनॉनमध्ये सक्रीय असलेली दहशतवादी संघटना हिजबुल्लाहनं देखील नुकताच इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलनं मंगळवारी लेबनॉन आणि गाझामध्ये त्याला चोख उत्तर दिलं. यावेळी इस्रायल सैन्यानं व्हाईट फॉस्फरसचा वापर केला असा आरोप जागतिक मानवी हक्क संस्था एमेनेस्टी इंटनरनॅशनल आणि ह्यूमन राईट्स वॉच लेबनाननं केला आहे. हा वापरण करणे आंतरराष्ट्रीय मानवी कायद्यांच्या (IHL) विरुद्ध आहे. इस्रायलनं घनदाट लोकसंख्या असलेल्या भागात याचा वापर केलाय, असा दावा IHL नं केलाय. त्याचे भविष्यातही गंभीर परिणाम होऊ शकतात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 या निमित्तानं व्हाईट फॉस्फरस काय आहे? तो किती गंभीर आहे? हे जाणून घेऊया

काय आहे व्हाईट फॉस्फरस? (What is White Phosphorus) 

व्हाईट फॉस्फरस हे चिकट केमिकल कॉम्पोनंट आहे. ते साधरणत: पिवळे आणि चिखलासारखा दिसतो. त्याचा वास बऱ्याच प्रमाणात लसणासारखा असतो. तो केमिकल ऑक्सिजनच्या संपर्कात येताच लगेच पेट घेतो. व्हाईट फॉस्फरस ऑक्सिजनच्या संपर्कात येताच त्याचा मोठ्या आवाज येतो आणि तो फुटतो. त्यामुळे तापमान 800 डिग्री सेल्सियसपर्यंत जाते. व्हाईट फॉस्फरसमध्ये एकदा आग लागली की ती आटोक्यात आणणे खूप अवघड असतो. तो स्किन आणि कपड्यांवर चिकटतो. 

किती धोकादायक आहे व्हाईट फॉस्फरस?

व्हाईट फॉस्फरस सर्व प्रकारे धोकादायक आहे. तो जळाल्यानंतर निघालेला धूर, फॉस्फेरिक अ‍ॅसिड, फॉस्फिनमुळे डोळे जळू लागलात. स्किनवर हे थोडं जरी पडलं तरी ते स्किनवरील हाडांपर्यंत पोहोचतात. एखाद्या व्यक्तीवर व्हाईट फॉस्फरस पडला तर त्यामुळे हाडं जळून जातात.  त्यामुळे हार्ट, किडनी आणि लिव्हरला देखील धोका निर्माण होतो. तसंच अवयव देखील निकामी होऊ शकतात. 


पाण्यानं देखील विजत नाही आग

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण व्हाईट फॉस्फरस बॉम्बमुळे निर्माण झालेली आग पाण्यानं विजत नाही. ही आग विजवण्यासाठी वाळू टाकण्यासारख्या प्रकाराचा वापर केला जातो. ही आग आटोक्यात आल्यानंतरही व्हाईट फॉस्फरसचा एखादा अंश शिल्लक राहिला तर तो हवेच्या संपर्कात आला तर त्यामुळे आग पुन्हा वाढते. व्हाईट फॉस्फरसमुळे स्नायू देखील खराब होतात. त्यामुळे व्यक्ती अपंग होऊ शकतो. 

काय आहेत नियम?

व्हाईट फॉस्फरसचा वापर आंतरराष्ट्रीय कायदे आणि सशस्त्र संघर्षच्या कायद्यानुसार अवैध नाही. पण त्याचा वापर हा फक्त बचावात्मक पद्धतीनं आणि युद्धच्या मैदानात उजेडासाठी केला तर त्याचा काही धोका नाही. पण, याचा वापर एखादा देश नागरिकांवर हल्ला करण्यासाठी करत असेल तर ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. हा युद्ध गुन्हा समजला जातो. 

( नक्की वाचा : माधुरी दीक्षितसह अनेक सेलिब्रेटींनी शेअर केलेल्या 'All Eyes On Rafah' फोटोचा अर्थ काय? )
 

सैन्याकडून का होतो वापर ?

सैन्याकडून अनेकदा युद्धाच्या मैदानात उजेड पाडण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर आग लावण्यासाठी देखील याचा वापर होतो. तसंच शत्रूंवर हल्ला करण्यासाठी देखील काही देश व्हाईट फॉस्फरसचा एक शस्त्र म्हणून वापर करतात. 

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वापर

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान प्रतिस्पर्धी देशांच्या सैन्यावर तसंच नागरिकांवर व्हाईट फॉस्फरस बॉम्ब टाकण्यात आला होता. अमेरिकानं व्हियतनाम युद्ध, 2004 मधील फालूजा येथील युद्ध, इराक आणि सीरियावरील हल्ल्यात याचा वापर केला होता. रशियानं देखील 22 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनच्या सैन्यावर कारवाई करतना व्हाईट फॉस्फरस बॉम्ब टाकले होते. रशियानं यापूर्वी सीरियामधील ISIS च्या दहशतवाद्यांच्या विरुद्ध देखील याचा वापर केलेला आहे. 

( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
 

इस्रायलनं 2008-09 मध्ये गाझावरील हमासच्या तळावर केलेल्या लष्करी कारवाईत व्हाईट फॉस्फरस बॉम्बचा वापर केला होता. जगातिक मानवी हक्क संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Nvidia कंपनीचा नवा रेकॉर्ड, शर्यतीत अ‍ॅपलला टाकलं मागे
हाडं वितळतात, 800 सेल्सियसपर्यंत वाढतं तापमान, काय आहे  White Phosphorus ज्याचा इस्रायलनं केलाय वापर
Who is Saurabh Netravalkar, the shining star of America's victory
Next Article
अमेरिकेच्या विजयात चमकणारा, कोण आहे सौरभ नेत्रावळकर?