अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे आदेश कार्यकाळाची आक्रमक सुरुवात केली आहे. 'टीम ट्रम्प'मध्ये अनेक भारतीय वंशांच्या व्यक्तींना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अमेरिकेतीत सर्वात मोठी सुरक्षा यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (FBI) प्रमुखपदी काश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत काश पटेल?
काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. काश पटेल हे मूळचे गुजराती असले तरी त्यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वकील म्हणून करिअरला सुरुवात केली. 45 वर्षीय काश पटेल यांचे पूर्ण नाव कश्यप प्रमोद पटेल आहे. त्यांनी हाउस इंटेलिजन्स कमिटीचे कर्मचारी सदस्य म्हणूनही काम केले आहे.
(नक्की वाचा- Donald Trump oath: अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही त्यांना अनेक जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. त्यांनी संरक्षण खात्यात चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले होते. पटेल हे अनेक वादातही अडकले आहेत. ट्रम्प प्रशासनाचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
पहिल्या कार्यकाळातही डोनाल्ड ट्रम्प यांना काश पटेल यांना एफबीआय किंवा CIA चे उपसंचालक बनवायचे होते. याद्वारे गुप्तचर यंत्रणांवर आपली पकड मजबूत करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र सीआयए संचालक जीना हॅस्पेल यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आणि ॲटर्नी जनरल बिल यांनी या निर्णयाला विरोध केला. कारण काश यांना जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था चालवण्याचा अजिबात अनुभव नव्हता. विरोध पाहता अखेर ट्रम्प यांना आपला निर्णय बदलावा लागला होता.
(नक्की वाचा - $TRUMP Meme Coin : ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी जगभर खळबळ, एक पोस्ट आणि गुंतवणूकदारांना 8000% फायदा)
कश्यप काश पटेल यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत . त्यांनी मुलांसाठी दोन काल्पनिक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. या पुस्तकांमध्ये ट्रम्प यांना राजाप्रमाणे दाखवण्यात आले आहे. तर काश स्वतःला एक जादूगार म्हणून सादर केले आहे.