जाहिरात

Baba Vanga: जग हातातून जाणार? 2026 मध्ये जगाचा नवा मालक येणार! बाबा वेंगाच्या 'त्या' भविष्यवाणीचा व्हिलन...

बाबा वेंगा यांनी आणखी एक भविष्यवाणी केली होती.

Baba Vanga: जग हातातून जाणार? 2026 मध्ये जगाचा नवा मालक येणार! बाबा वेंगाच्या 'त्या' भविष्यवाणीचा व्हिलन...

जगात भविष्य वर्तवणाऱ्यांमध्ये सध्या नॉस्ट्राडेमस (Nostradamus) हे सर्वात मोठे नाव मानले जाते. यानंतर दुसरे नाव आहे, ज्यांना “बाल्कनची नॉस्ट्राडेमस” म्हणून ओळखले जाते. त्या आहेत बाबा वेंगा (Baba Vanga). बल्गेरियाच्या या रहस्यवादी महिलेच्या अनेक भविष्यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यांचे अनुयायी त्यांच्या प्रत्येक शब्दावर विचार करण्यास भाग पाडतात. अशीच एक त्यांची भविष्यवाणी सध्या चर्चेत आहेत. त्यात त्यांनी जगावर कोणाचं राज्य येणार हे सांगितलं आहे. शिवाय त्याबाबत काही वक्तव्य ही केलं आहे. सध्या त्याचीच चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. 

नॉस्ट्राडेमस यांच्याप्रमाणेच, बाबा वेंगा यांनीही आपल्या भविष्यवाण्या कोड्याच्या स्वरूपात केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, वेंगा यांनी असे संकेत दिले आहेत की 2026 हे वर्ष मानवासाठी धोक्याचे ठरू शकते. या वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इतके प्रगत किंवा शक्तिशाली होईल की ते माणुसाच्या बाजूने राहणार नाही. AI मानवी नियंत्रणाबाहेर जाऊन मानवी जीवनावर वर्चस्व गाजवायला सुरुवात करेल. अशी कथित चेतावणी त्यांनी दिली आहे. गेल्या 1-2 वर्षांत AI ची वाढ ज्या वेगाने होत आहे, त्यामुळे नैतिकता, सुरक्षितता आणि यंत्रांवर मानवाचे वाढते अवलंबित्व या संबंधी सध्या सुरू असलेल्या जागतिक चर्चांशी बाबा वेंगाची भविष्यवाणी सुसंगत ठरते.

नक्की वाचा - Pune News: पुणे तिथे काय उणे! ऐन दिवाळीत नामांकीत पबमध्ये रंगला जुगाराचा डाव, Video viral

बाबा वेंगा यांनी आणखी एक भविष्यवाणी केली होती. त्यानुसार  63 वर्षांनंतर, म्हणजेच 2088 मध्ये जगात एक असा विषाणू पसरेल त्याची कुणालाच कल्पना नाही. या विषाणूमुळे जगभरातील लोक हे वेगाने म्हातारे होतील. म्हणजेच जगभरातील लोकांचे आयुष्य हे वेगाने कमी होणार आहे असं त्यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटलं आहे. शिवाय मनुष्य  कमी वयातच मृत्यूच्या जवळ पोहोचेल. ही भविष्यवाणी येत्या सहा दशकांनंतरची असली, तरी सध्याचे हवामान बदल, जैविक युद्ध (Biological Warfare) आणि प्रयोगशाळांमध्ये तयार होणारे विषाणू लक्षात घेता, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज वर्तवली जात आहे.

नक्की वाचा - 'माझं गाणं पाहीलं अन् 'त्यांनी' अखेरचा श्वास घेतला', आला रे आला पिळगावकरांचा नवा कंटेन्ट आला

बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. त्यांचा जन्म 1911 मध्ये आजच्या नॉर्थ मॅसेडोनिया येथे झाला. 12 वर्षांच्या असताना, एका वादळामुळे (Tornado) त्यांची दृष्टी गेली. त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या मते, यानंतर त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली. वयाच्या 30 वर्षांपूर्वीच त्या भविष्यवाण्या आणि उपचारांमुळे प्रसिद्ध झाल्या. बल्गेरियाचे राजा बोरिस तृतीय आणि सोव्हिएत नेते लिओनिद ब्रेझनेव यांसारखे दिग्गजही त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत असत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com