जाहिरात

दहशतवाद्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, मुलं जन्माला घालायची होती! इस्रायली तरुणीने सांगितली थरकाप उडवणारी कहाणी

नोगा वीस हिची 25 नोव्हेंबरला सुटका करण्यात आली. गाझामध्ये तिच्यावर काय आपत्ती ओढावली होती हे तिने तपशीलवार सांगितले आहे. तिने सांगितले की "त्या माणसाने मी कैदेत असताना 14 व्या दिवशी मला एक अंगठी दिली आणि म्हटलं की तुम्हा सगळ्यांना सोडून देईन मात्र तुला माझ्यासोबत इथे राहावे लागेल. मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुला माझी मुलं जन्माला घालावी लागतील. "

दहशतवाद्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, मुलं जन्माला घालायची होती! इस्रायली तरुणीने सांगितली थरकाप उडवणारी कहाणी

हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. 7 ऑक्टोबर 2023 पासून हे युद्ध पेटलं असून ही आग अद्यापही धुमसत आहे. 7 ऑक्टोबरला हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर 5 हजारांहून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसत जवळपास 250 नागरिकांचे अपहरण केलं होतं. यातील जवळपास 100 ओलीस आतापर्यंत सोडण्यात आले आहेत. मात्र अजूनही बरेच नागरीक हमासच्या तावडीत आहेत. हमासच्या तावडीतून सुटून पुन्हा मायदेशी परतलेल्या नागरिकांमध्ये 18 वर्षांच्या नोगा वीस हिचाही समावेश होता. नोगा 50 दिवस दहशतवाद्यांच्या तावडीत होती. ओलीस ठेवलेलं असताना एका तरुण दहशतवाद्याने तिला लग्नासाठी गळ घातली होती. मला तुझ्याशी लग्न करायचाय आणि मुलं जन्माला घालायची आहेत, असं या दहशतवाद्याने म्हटलं होतं, असं नोगाने सांगितलंय.  टाईम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तात म्हटलंय की,  त्या दहशतवाद्याने लग्नाची गळ घातल्यानंतर नोगाने , आपल्याला दहशतवाद्याने गोळी मारू नये म्हणून हसण्याचे नाटक केले होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

अपहृतांमध्ये महिला, बालकांची संख्या अधिक

7 ऑक्टोबरला क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केल्यानंतर हमासचे दहशतवादी गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये घुसले होते. त्यांनी अनेक इस्रायली नागरिकांची घरात घुसून हत्या केली आणि अनेकांना पकडून नेलं होतं. यामध्ये महिला आणि बालकांचाही समावेश होता. नोगा ही इस्रायलच्या किबुत्जची रहिवासी असून तिचे वडील इलान (56 वर्षे) आपात्कालीन पथकात सामील होण्यासाठी रवाना झालेले तिचे वडील घरी परतलेच नाहीत. काही दिवसांनंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचे कळाले होते. हत्या करून त्यांचा मृतदेह गाझाला नेण्यात आला होता. 

(नक्की वाचा - देवाला नमस्कार, बाईकवर स्टंट; 'स्पायडरमॅन' आणि 'स्पायडर वुमन' पोलिसांच्या ताब्यात)

अपहरणाचा दिवस आठवताना नोगाने म्हटलंय की दहशतवाद्यांनी दरवाज्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. जवळपास 40 गोळ्या त्यांनी झाडल्या होत्या. व्हॉटसअपमुळे बाहेर काय सुरू आहे याबाबत नोगाला कळालं होतं. व्हॉटसअप ग्रुपमधील काही लोकांनी त्यांच्या घराला आग लावल्याचं सांगितलं होतं. काही वेळाने त्या ग्रुपवर पोस्ट येणं बंद झालं. नोगाच्या घरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिच्या आईने तिला पलंगाखाली लपवलं होतं. आपल्याला मारलं तरी आपली मुलगी सुरक्षित राहील असा तिच्या मनात विचार आला होता. मात्र दहशतवादी नोगाला घेऊन गेले. नोगाच्या आईचेही दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. या दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. नोगाला अनेक दिवस एका भुयारात कोंडून ठेवण्यात आले होते. तिथून एका घरात तिला डांबण्यात आले होते. तिथेच नोगा आणि तिच्या आईची पुन्हा भेट झाली होती. 

(नक्की वाचा : सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप )

नोगाच्या आईला दहशतवाद्यांनी केवळ यासाठी जिवंत ठेवलं होतं कारण एका दहशतवाद्याला नोगाशी लग्न करायचं होतं. नोगाला दहशतवाद्याने अंगठी दिल्यावर लग्नाची गळ घातली होती. लग्न करायचे असल्यानेच आपण तुझ्या आईची भेट घालून दिली असल्याचे दहशतवाद्याने नोगाला सांगितले होते. आईची लग्नाला मंजुरी मिळावी यासाठी ही भेट घालून दिल्याचेही त्याने सांगितले. नोगाच्या आईने नम्रपणे आपण या लग्नासाठी तयार नसल्याचे सांगितले, मात्र तरीही तो दहशतवादी लग्नासाठी हटून बसला होता. 

नोगाने म्हटलंय की ती आजही या आठवणी विसरू शकलेल्या नाही. 50 दिवस 24 तास ती हाच विचार करायची की तिला अजून गोळी का मारण्यात आलेली नाही. गाझामध्ये आम्हाला अत्यंत वाईट  वागणूक देण्यात आली, पिण्यासाठी फक्त अर्धा लिटर पाणी देण्यात यायचे आणि ते दोन दिवस पुरवायला लागायचे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
महिला अँकरकडे पाहात झाकीर नाईक म्हणाला की…. विधान ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल
दहशतवाद्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, मुलं जन्माला घालायची होती! इस्रायली तरुणीने सांगितली थरकाप उडवणारी कहाणी
Richard Slamen living on pig kidney dies after 2 months transplant
Next Article
डुकराच्या किडनीवर जगणाऱ्या व्यक्तीचा 2 महिन्यात मृत्यू; प्राण्यांचे अवयव वापरण्याची का आली वेळ?