विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. आता 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मतदारांचा कौल महायुती की महाविकास आघाडी कुणाच्या बाजून लागणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने निकालाआधीच बैठका सुरु केल्या आहेत. महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास राजकीय गणित असतील किंवा बहुमत नसल्यास काय राजकीय गणित असतील याबाबत सविस्तर आढावा गुरुवारी रात्री मातोश्रीवरील बैठकीत घेण्यात आला आहे.
पुण्यात झळकले चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे पोस्टर्स
पुण्यात झळकले चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे पोस्टर्स
पुण्यातील कोथरूड मतदार संघात लावण्यात आले विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स
निकालाआधीच भाजपकडून शहरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी
शहरात अनेक मतदार संघात झळकले उमेदवारांना शुभेच्छा देणारे बॅनर्स
भाजप-महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर
भाजप-महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर
बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्याची भाजप नेत्यांवर जबाबदारी
मंत्री रवींद्र चव्हाण , भाजप नेते प्रवीण दरेकर , संजय कुटे , मोहित कंबोज , नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी
अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
सागर बंगल्यावर भेट
महायुतीसोबत जी चर्चा करायची ती राज ठाकरे स्वत: करतील- नांदगावकर
मुंबईत भाजपला धक्का, भाजपचे माहीम विधानसभेचे उपाध्याय सचिन शिंदे शिवसेना ठाकरे गटात
मुंबईत भाजपला धक्का, भाजपचे माहीम विधानसभेचे उपाध्याय सचिन शिंदे शिवसेना ठाकरे गटात, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
निवडणूक निकालापूर्वीच अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात झळकले ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर
निवडणूक निकालापूर्वीच अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात झळकले ठाकरे गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या विजयाचे बॅनर.
गजानन लवटे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे लावले बॅनर.
दर्यापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे गजानन लवटे, शिवसेनेचे अभिजीत अडसूळ आणि युवा स्वाभिमानचे रमेश बुंदिले यांच्यात लढत.
पुण्यात निवडणूक संपताच कोयता गँग पुन्हा अॅक्टिव्ह
पुण्यात निवडणूक संपताच कोयता गँग पुन्हा अॅक्टिव्ह. पुण्यातील वानवडी परिसरामध्ये रात्रीच्या वेळी काही गाड्यांची तोडफोड. चार गावगुंडांकडून दहशत पसरवण्यासाठी करण्यात आला प्रकार. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सहा ते सात गाड्यांचीटोळी कडून तोडफोड
सोलापुरात मतदानाच्या दिवशी फटाके फोडणे पडले महागात, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
सोलापुरात मतदानाच्या दिवशी विजापूर वेस परिसरात फटाके फोडणाऱ्या सात जणांविरूद्ध जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कैफ अरिफ अलमेलकर, हुसेन मुश्ताकअहंमद मैदगी यांच्यासह 4 ते 5 जणांवर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता तसेच बुधवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया सुरू असताना, बेगमपेठ ते विजापूर वेस दरम्यान शॉपर स्वेअर अपार्टमेंटजवळील 5 ते 6 जणांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून फटाके फोडले.
सांगलीतील शाळगाव एमआयडीसीतील वायू गळती दुर्घटनेतील दोन महिलांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने 9 लोक अत्यवस्थ झाले होते. यातील 7 जणांना रात्री कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यामधील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुचिता उथळे (वय 50), तर नीलम रेठरेकर (वय 26) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अन्य 5 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
सोलापुरातील ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद टोकाला, शरद कोळींची गाडी फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक
सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्षांकडून शरद कोळींची गाडी फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक. शरद कोळी यांची गाडी फोडल्यास खासदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांचे घर फोडू. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा काँग्रेसला सज्जड दम. काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शरद कोळींच्या कार्यालयाबाहेर बांगड्या आणि चप्पल दाखवत आंदोलन केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक. नारायण राणेसारख्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना शरद कोळी पुरून उरलेत त्यामुळे तुम्ही तर किरकोळ आहात, असं पाटील यांनी म्हटलं.
संख्याबळ मिळाले, तर सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांसोबत राहणार : प्रकाश आंबेडकर
संख्याबळ मिळाले, तर सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांसोबत राहणार : प्रकाश आंबेडकर
If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 22, 2024
We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!
अफगाणिस्तान 4.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला
अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रदेशात शुक्रवारी पहाटे 4.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने याबाबत माहिती दिली. भारतीय वेळेनुसार पहाटे 6.35 वाजता भूकंपाचा धक्का बसला.
Earthquake of Magnitude 4.4 hits Afghanistan
— ANI Digital (@ani_digital) November 22, 2024
Read @ANI story | https://t.co/qUrnQ6FZxM #Afghanistan #Earthquake pic.twitter.com/Mo06dIAKka
काँग्रेसच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि तेलंगणा सीएम रेवंथ रेड्डी यांच्याकडे
काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व विजयी आमदार यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि तेलंगणा सीएम रेवंथ रेड्डी यांच्याकडे राहणार. निकालानंतर आमदारांना गरज लागल्यास कदाचित कर्नाटक येथे घेऊन जाण्याची शक्यता. बहुमताचा आकडा महाविकास आघाडी पूर्ण केल्यावरच मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार कोण यावर सार्वजनिक चर्चा करावी. काँग्रेस हायकमांडचे राज्यातील नेत्यांना सूचना.
काँग्रेस नेत्यांची सकाळी 10 वाजता बैठक,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक
काँग्रेस नेत्यांची सकाळी 10 वाजता बैठक. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक. उद्याच्या बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची महत्वपूर्ण बैठक. आमदारांना नेमकं सुरक्षित कुठे ठेवायचं यावर केली जाणार.
इंदापूरात मतमोजणीपूर्वीच झळकले आजी माजी आमदारांचे विजयाचे बॅन
इंदापूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होण्यापूर्वीच पुण्याच्या इंदापूर शहरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. भरणे आणि पाटील यांची इंदापूर विधानसभेवर प्रचंड मताधिक्क्याने निवड झाल्याबद्दल अभिनंदन असे हे बॅनर आहेत. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.