जाहिरात
2 days ago
मुंबई:

आज 31 डिसेंबरनिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याशिवाय पर्यटन क्षेत्रांवरही मोठी गर्दी पाहायला मिळते.  दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडवर बीडचे स्थानिक प्रशासन किती मेहरबान होते याबाबत आता खुलासे होऊ लागले आहेत. कराडवर एक-दोन नव्हे तर तब्बल 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आला. विशेष म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. धक्कादायक म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या 245 जणांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. यात कराडचेही नावे होते. 

सीआयडीचे पथक वाल्मिक कराडला घेवून केजमध्ये दाखल

सीआयडीचे पथक वाल्मिक कराड याला घेवून केज पोलिस स्थानकात दाखल झाले आहे. त्याला काही वेळात न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्या समर्थकांना तिथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव वर्षाचं जल्लोषात स्वागत

न्यूझीलंड बरोबरच ऑस्ट्रेलियातही नव वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. ऑकलंड आणि सिडनीमध्ये नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. 

शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना जिवे मारण्याची धमकी

शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. कुणाल सरमळकर यांच्या वांद्रे येथील कार्यालयात निनावी पत्र आलं आहे. पत्रात सरमळकर यांच्या जिवाला धोका असून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा उल्लेख आहे. राजकीय पूर्ववैमन्यसातून ही धमकी आला असल्याचा सरमळकर यांचा दावा आहे. 

पुणे CID चं पथक वाल्मिक कराडला घेऊन बीडला रवाना

पुणे CID चं पथक वाल्मिक कराडला घेऊन बीडला रवाना झालं आहे. वाल्मिक कराडला बीडला नेण्यात येत आहे. पुणे सीआयडीमध्ये हजर झाल्यानंतर वाल्मिक कराडला एक पथक बीडच्या दिशेने रवाना झालं आहे. 

सुरेश धस यांचा विषय माझ्यासाठी संपला- प्राजक्ता माळी

सुरेश धस यांनी महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आता त्यांच्यावर कुठली कायदेशीर कारवाई मी करणार नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. संतोष देशमुख यांच्या बाबत जे झालं  ते निंदनीय आहे. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली आहे. 

संतोष देशमुख हत्ये प्रकरणी कुणालाही सोडणार नाही - देवेंद्र फडणवीस

बीडच्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा हत्येशी संबध आढळेल. त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही. कुणाला हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. तपास गतिशिल केला आहे. त्यामुळेच वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली. जे फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी टीम कार्यरत आहेत असंही त्यांनी सांगितलं. 

धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा- संदीप क्षिरसागर

जर वाल्मिक कराड स्वत:ला निर्दोष मानत असेल तर इतके दिवस फरार का होता. असा प्रश्न आमदार संदीप क्षिरसागर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे.  

Live Update : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी नाशिक जिल्ह्यात झालेली आहे. विविध धार्मिक ठिकाणी आणि खास करून नाशिकमधील प्रसिद्ध असलेल्या विनीयार्ड्सला खास पसंती दिसून येत आहे. 

नाशिकमधील प्रसिद्ध सुला विनीयार्डमध्ये पर्यटकांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी केली आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरातून पर्यटक या विनीयार्डमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक मुंबई महामार्गामध्ये झालेली सुधारणा आणि नाशिकला सध्या एअर कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे

Live Update : Walmik Karad वर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

Live Update : वाल्मिक कराडला पुण्यात लपवण्यात अजित पवारांचा हात, अंजली दमानियांचा गंभीर आरोप

वाल्मिक कराडला पुण्यात लपवण्यात अजित पवारांचा हात, NDTV मराठीशी बोलताना अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप

Live Update : अमरावतीत 3 दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय..

अमरावतीत 3 दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय..

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या निषेधार्थ अमरावतीत  ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय..

अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायत आजपासून 3 दिवस राहणार बंद..

संतोष देशमुखच्या हत्येतील मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी..

तीन दिवस ग्रामपंचायत बंद राहणार असल्याने कामे रखडणार...

Live Update : थर्टी फस्टसाठी साडे तीन हजार लिटर मिसळ, नाशिकमध्ये नागरिकांमध्ये उत्साह

थर्टी फर्स्ट निमित्ताने मिसळ हब म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील मिसळचे जवळपास सर्वच रेस्टॉरंट आज मिसळप्रेमींच्या गर्दीने भरून गेली आहेत. महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातून देखील पर्यटक नाशिकमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहे. मिसळीचा आस्वाद घेत ते आनंद लुटतायत. 

प्रसिद्ध ग्रेप एम्बसी हॉटेलमध्ये तर आज तब्बल साडेतीन हजार लिटर मिसळ तयार केली जात आहे. 

Live Update : वाल्मिक कराड शरण : ED चे अधिकारीदेखील चौकशीसाठी पुण्यातील CID कार्यालयात दाखल

वाल्मिक कराड शरण प्रकरणात ED चे अधिकारीदेखील चौकशीसाठी पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल

Live Update : 'पळून पळून तरी कुठपर्यंत पळणार', वाल्मिक कराडच्या शरणाच्या वृत्तानंतर धसांची पहिली प्रतिक्रिया

वाल्मिक कराड स्वत: शरण आले ही चांगली बाब आहे. पळून पळून तरी कुठपर्यंत पळणार. माझी एक विनंती आहे जरी ते अरेस्ट झाले तरी त्यांची संपत्ती गोठवणं सुरू राहायला हवं. 

शरण आले किंवा अटक एकच. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचणार होते, त्यामुळे ते आधीच दाखल झाले. 

हत्या करणाऱ्यांबरोबर त्याचा आदेश देणाऱ्यांबद्दल जास्त चीड आहे. हत्येचा आदेश देणारे आका हे वाल्मिक कराडच आहेत. 

सुरेश धस, भाजप आमदार

Live Update : वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण

Live Update : वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण

Live Update : पुणे CID कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, वाल्मिक कराड आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता

पुणे CID कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

वाल्मिक कराड आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण करण्याची शक्यता

पुणे परिमंडळ १ चे उपायुक्त संदीप सिंह गिल आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे देखील CID कार्यालयात दाखल 

संदीप सिंह गिल सीआयडी कार्यलयात चर्चा करून पडले बाहेर

Live Update : छगन भुजबळ आणि अजित पवार 31 डिसेंबर साजरा करायला परिवारसह परदेशात

राज्यात एनसीपी पक्षांअंतर्गत छगन भुजबळ अजित पवार यांचाच कोल्डवाॅर सुरू असतानाच दोन्ही नेत्यांची  परदेशवारीवर…

भुजबळ आणि अजित पवार 31 डिसेंबर साजरा करायला परिवारसह परदेशात 

भुजबळ 2 जानेवारी तर अजित पवार 3 जानेवारीला मुंबईत पुन्हा परत येणार 

मागील काही दिवसांत भुजबळ आणि पवार यांचात मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने टोकाचे मतभेद वाढले होते. त्यातच भुजबळ यांनी सीएम फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर जानेवारीत पहिल्या आठवड्यापर्यंत भुजबळ यांना शांत राहण्याचा सल्ला सीएम फडणवीस यांनी दिला होता. भुजबळ आणि पवार आता  दोन्ही नेते परदेशात

Live Update : संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत

बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख यांनी काल मुंबई खंडपीठाच्या छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आशा सहा मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यानंतर धनंजय देशमुख आज अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते दाखल झाले असल्याची माहिती समोर आली असून धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Live Update : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी भाविक संत गजानन महाराजांच्या चरणी लीन..

नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर आज मंगळवार ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करता येणार आहे. 

Live Update : पुण्यातील कात्रज घाटात गोळीबार, एका रुग्णालयातील वॉर्ड बॉय जखमी

पुण्यातील कात्रज घाटामध्ये दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती असून दीपक लोकर या एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉय जखमी झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास दीपक लोकर यांना अज्ञाताने कात्रज घाटात नेलं होतं, येथे त्यांच्यावर फायरिंग करण्यात आली. दीपक यांच्या छातीमध्ये गोळी अडकली असून घटनास्थळावरुन पोलिसांना एक पिस्टल मिळाली आहे

Live Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खोपोली एग्झिटवर केमिकल ड्रममधून गळती

खोपोली हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाट उतरताना काही केमिकल ड्रम पडून लिकेज झाले होते. परंतु वेळीच IRB यंत्रणा, देवदूत,  हेल्प फाऊंडेशनच्या मदतीने ड्रम एका बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यामुळे सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.

Live Update : अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुणे CID ऑफिसमध्ये दाखल, वाल्किम कराड काही वेळात शरण येण्याची शक्यता

अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुणे CID ऑफिस मध्ये दाखल, वाल्किम कराड काही वेळात शरण येण्याची शक्यता  

Live Update : वाशिम जिल्ह्यातील 491 ग्राम पंचायतीचे कामकाज आजपासून तीन दिवस बंद

वाशिम जिल्ह्यातील 491 ग्राम पंचायतीचे कामकाज आजपासून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून या सर्व ग्राम पंचायतीचे कामकाज बंद राहणार असून यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीचे कामकाज ठप्प होत असल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

Live Update : चित्रपट दिग्दर्शक मधूर भांडारकर सिद्धिविनायक चरणी...

येत्या वर्षात चांगल्या कामगिरीसाठी सिद्धीविनायकाच्या बाप्पाकडे प्रार्थना केली. 2024 मध्ये भरपूर गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, त्या 2025 मध्ये करणार आहे. आपल्या बॉलिवूड क्षेत्राची वाटचाल काहीशी थांबली आहे. बॉलिवूडची प्रगती गेल्या काही कालवधीपासून होत नाहीये, चित्रपट चालत नाहीये यासाठी देखील बापाला प्रार्थना केली. दोन महत्त्वाचे प्रोजेक्ट 2025 मध्ये मी घेऊन येतोय. प्रत्येक गोष्टीला एक वेळेस जाऊ द्यावा लागतो. मराठी चित्रपट इंडस्ट्रीचं देखील तसंच आहे. चांगले चित्रपट तयार होत आहेत. मात्र थोडा वेळ गेल्यानंतर हे चित्रपट सुद्धा चालतील. 

Live Update : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 8 बुलेटस्वारांवर कारवाई

वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी, तसेच अपघातांचे धोके वाढले आहेत. विशेषत: बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेटस्वारांची संख्या वाढत आहे. यातून ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे चंद्रपुरातील  वाहतूक नियंत्रण शाखेचा वतीने रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज  करून सुसाट  बुलेट पळविणाऱ्या चालकावर कारवाईचा बडगा उभारला आहे. यात ८ वाहनधारकांवर कारवाई करीत दुचाकी  जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचे सायलेन्सर काढण्यात आले आहे . 

Live Update : मद्यपान करून वाहन चालवण्यावर आरटीओची नजर

ड्रंक अँड ड्राईव्हवर असणार आरटीओची नजर 

विविध ठिकाणी मद्यपान करून वाहन चालवण्यावर कारवाई करणार

31 डिसेंबरला वर्षाला निरोप देताना मद्यसेवन करुन वाहन चालविणाऱ्या विरोधात पुणे पोलिसांबरोबरच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) तपासणी मोहीम

त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे

या पथकांकडून शहरातील विविध ठिकाणी, वर्दळीच्या रस्त्यांवर तपासणी करण्यात येणार आहे

Live Update : आज सकाळी 11 वाजता पुणे CID ऑफिसला वाल्मिक कराड हजर होण्याची शक्यता

संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर होण्याची शक्यता 

आज सकाळी 11 वाजता पुणे CID ऑफिसला वाल्मिक कराड हजर होण्याची शक्यता 

बीड प्रकरणातील आरोपी गेल्या काही दिवसापासून फरार होते 

आज पुण्यात हजर होण्याची शक्यता

Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधु धनंजय देशमुख अंतरवली सराटीकडे रवाना

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवली सराटीकडे रवाना

आज सकाळी १० वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत 

धनंजय देशमुख आणि जरांगे पाटील यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार 

CID चौकशीनंतर धनंजय देशमुख जरांगे यांच्या भेटीला 

नोटीस पाठवून CID ने धनंजय यांना घेतले होते बोलावून

Live Update : पुण्यात मेट्रो स्टेशनवर डिरेक्शन बोर्ड्सचा अभाव, पुणेकरांची गैरसोय

पुणेकरांनी पसंती दिलेल्या मेट्रोला आता पुणेकरांची नाराजी सहन करावी लागत आहे. मेट्रो स्थानकावर डिरेक्शन बोर्ड्सचा अभाव असल्याने नक्की स्थानकावरून कुठून बाहेर पडायचं हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकाला दोनहून अधिक एग्जिट पॉईंट्स आहेत. त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित ठिकाणाहून एग्झिट घेता येत नाही.  

Live Update : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ हत्या प्रकरणात देण्यात आलेल्या सुपारीचे पैसे केले जप्त

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ हत्या प्रकरणात देण्यात आलेल्या सुपारीचे पैसे केले जप्त 

आपल्या पतीला मारण्यासाठी पत्नी मोहिनी वाघ हिने आपल्या प्रियकराला म्हणजेच मुख्य आरोपी अक्षय जवळकर याला 5 लाखांची सुपारी दिली होती 

त्या 5 लाखांपैकी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 1 लाख 56 हजार रुपये हे जप्त करण्यात आले आहेत 

सतीश वाघ यांचा 9 डिसेंबरला अपहरण करून खून करण्यात आला होता 

आपल्या प्रेमात अडथळा निर्माण होत असल्याने आणि रोजची मारहाण होत असल्याने मोहिनी वाघ (पत्नीनेच) त्यांच्या खुनाची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलx

Live Update : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उत्साह, पण हवेची गुणवत्ता ढासळली

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज सगळीकडेच उत्साह दिसत आहे. असे असले तरीदेखील हवेची गुणवत्ता ढासळल्याने संपूर्ण मुंबईत धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे.

Live Update : वाल्मिक कराड महाराष्ट्रातच, आजच पोलिसांना शरण येण्याची माहिती

वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती समोर आली असून आज ३१ डिसेंबरला शरण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Live Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंचांच्या हत्तेच्या निषेधार्थ आजपासून सरपंच संघटनेचं कामबंद आंदोलन

बीड जिल्हातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व राज्यात सरपंचावर होणारे जिवघेणे हल्ले थांबवावे  व संतोष देशमुख यांच्या मारेकरीला कठोर कारवाई करण्यात यावी. या घटनेच्या निषेधार्थ आजपासून भंडारा जिल्ह्यातील सरपंचांनी कामबंद आंदोलन पुकारला आहे. 2 जानेवारीला तारखेला पूर्ण जिल्ह्यातील सुमारे 500 सरपंच हे भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

Live Update : ड्रंक अँड ड्राइव्ह केलं तर 10 हजारांचा दंड अन् गाडी-परवानाही रद्द

आपण नागपुरात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. नागपूर पोलिसांनी एक दिवस आधीच नाका बंदी आणि वाहन तसेच वाहन चालकांची चौकशी सुरू केली आहे. यावेळी 31 डिसेंबर रोजी घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा स्पष्ट संदेश आहे, मद्य प्राशन करून वाहन चालवले तर दहा हजार रुपयांचा दंड बसेल, गाडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होईल. 

Live Update : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी भाविक संत गजानन महाराजांच्या चरणी, शेगावात भाविकांची मांदियाळी

बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाताळच्या सलग सुट्ट्या, सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांची कुठलीच गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून देखील विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे.

Live Update : आज 2024 वर्षाचा शेवटचा दिवस, नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण

आज 31 डिसेंबरच्या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याभरात आज ५ वाजेपर्यंत पब खुले राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय वाईन शॉपदेखील ५ वाजेपर्यंत खुले राहणार असल्याची माहिती आहे. तरीही नागरिकांनी नववर्षाचा आनंद साजरा करताना नियमांचं भान ठेवावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com