
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील 134 अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याचा नोटीसा देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक अति धोकादायक इमारती एच/पश्चिम आणि पी/उत्तर विभागातील आहेत.
पावसाळा सुरु होण्याआधी मुंबई महापालिकेकडून अशा इमारतींच सर्वेक्षक केलं जातं. पावसाळ्यात या इमारती कोसळू शकतात, यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी तात्काळ या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
(नक्की वाचा- ST White paper : एसटी महामंडळाकडून 8 दिवसात काढली जाणार श्वेतपत्रिका)
मुंबईत कुठे किती अतिधोकादायक इमारती?
- पी/उत्तर विभाग- 15 (मढ , मालवणी, मालाड, अप्पा पाडा)
- एच/पश्चिम विभाग- 15 (वांद्रे पश्चिम, सांताक्रुझ पश्चिम)
- के पूर्व विभाग - 11 ( अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व)
- एन विभाग- 11 ( विद्याविहार, घाटकोपर)
- के/पश्चिम - 10 ( वर्सोवा , सात बंगलो , जुहू )
- आर मध्य - 8 ( बोरिवली,चिकूवाडी , वजरी नाका )
- पी/दक्षिण विभाग- 7 ( गोरेगाव ,आरे कॉलनी , राम मंदिर )
- एच पूर्व विभाग- 7 ( वांद्रे पूर्व, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व)
- डी विभाग - 6 ( गिरगाव , मलबार हिल , ग्रॅंट रोड )
- जी उत्तर विभाग- 6 ( माटुंगा , माहीम , शिवाजी पार्क)
- एल विभाग- 6 (साकीनाका , चांदिवली, कुर्ला )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world