जाहिरात
This Article is From May 17, 2024

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक 

फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; वेळेत बदल, जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक 
मुंबई:

फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून हा ब्लॉक सुरू होणार असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी अपडेटेड वेळापत्रक जाणून घ्या. मध्ये रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 10-11 च्या विस्तारीकरणाने काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे आज 17 मे, शुक्रवारी रात्रीपासून 1 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत रात्री सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 10-11 च्या विस्तारीकरणासाठी इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. 

पुढील 15 दिवसांसाठी होणारे बदल...
- रात्री 12.14 वाजताची CSMT-कसारा लोकल शेवटची असेल. 
- ब्लॉकदरम्यान CSMT-भायखळा लोकल सेवा बंद राहिल. 
- रात्री 9.43 वाजताची कर्जत-CSMT लोकल कल्याणहून रात्री 10.34 वाजता CSMT कडे जाणारी शेवटची लोकल
- ठाण्याहून पहाटे CSMT कडे जाणारी पहिली लोकल 4 वाजता असेल.
- पहिली CSMT-कर्जत लोकल पहाटे 4.47 वाजता सुटेल.

नक्की वाचा - यंदा लवकर होणार मान्सूनचं आगमन, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

लोकल गाड्यांसह एक्सप्रेस गाड्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. 
- CSMT-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंत चालविण्यात येईल.
- CSMT-चेन्नई सुपरफास्ट मेल, CSMT-अमृतसर एक्स्प्रेस, CSMT-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, CSMT-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या दादरहून सुटतील. 
- लखनऊ-CSMT पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-CSMT एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, मडगाव-CSMT जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-CSMT तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-CSMT एक्स्प्रेस, हैदराबाद-CSMT हुसैन सागर एक्स्प्रेस, होसपेट जंक्शन-CSMT एक्स्प्रेस, शिर्डी-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस, हावडा-CSMT सुपरफास्ट या रेल्वेगाड्या दादर स्थानकापर्यंतच असतील. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com