जाहिरात

बदलापुरातील 'त्याच' शाळेची विद्यार्थिनी घर सोडून गेली, छत्रपती संभाजीनगमध्ये सापडली

बदलापूर अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या 'त्या' शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे. त्या शाळेतून तिने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

बदलापुरातील 'त्याच' शाळेची विद्यार्थिनी घर सोडून गेली, छत्रपती संभाजीनगमध्ये सापडली

निनाद करमरकर, बदलापूर

बदलापूरमधील दोन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर तेथील शाळा चर्चेत आहेत होती. आता पुन्हा एकदा बदलापुरातील त्याच शाळेतील विद्यार्थिनीसंबंधीची बातमी समोर आली आहे.  बदलापूर येथील 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून गेली होती, ती छत्रपती संभाजीनगर शहरात सापडली आहे. 

वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरची 15 वर्षांची मुलगी घर सोडून बाहेर पडली. रेल्वेने ती शुक्रवारी रात्री 2 वाजता शहरात आली होती. शनिवारी दिवसभर स्थानकावर बसून राहिली. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला तिची माहिती देण्यात आली.दामिनी पथकाने लगेच धाव घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले . 

(नक्की वाचा- Audio Clip : "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली..", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ)

दामिनी पथकातील अंमलदार निर्मला निभोरे, रुपाली शिंदे यांनी बाबा चौकात धाव घेततीची विचारपूस केली. बदलापूर अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या 'त्या' शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे. त्या शाळेतून तिने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 

(नक्की वाचा - आता पती पत्नींच्या मार्गातला काटा का ठरतोय? अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर)

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय मुलीच्या आईने दुसरे लग्न केले आहे. सावत्र वडील तिला त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून ती गुरुवारी रात्री मोबाइल बंद करून घर सोडून निघून आली. दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी  तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. महिला पोलिसांनी कुटुंबाला संपर्क केल्यानंतर तिची आई रात्री इकडे निघाली. तिच्या जेवण, राहण्याची व्यवस्था पोलीस करत असल्याचे पाहून मुलीला अश्रू अनावर झाले. दामिनी पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ देखील टळला आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
बैठका, चर्चा पण तिढा कधी सुटणार? महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अपडेट
बदलापुरातील 'त्याच' शाळेची विद्यार्थिनी घर सोडून गेली, छत्रपती संभाजीनगमध्ये सापडली
leafy vegetables cost increased Coriander sold at Rs 450 pair methi 250 in Nashik market
Next Article
पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्डतोड वाढ; दर 400 पार, कोथिंबिरीला गावठी कोंबडीचा भाव