जाहिरात

'निर्बुद्ध आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते', आशिष शेलारांचा घणाघात

Ashish Shelar on Aditya Thackeray : धारावी प्रकल्पावर प्रश्न निर्माण करणारे निर्बुद्ध आदित्य शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते आहेत, अशी टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. 

'निर्बुद्ध आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते', आशिष शेलारांचा घणाघात
मुंबई:

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी पहिल्यांदाच गुरुवारी (17 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. धारावी प्रकल्पावर प्रश्न निर्माण करणारे निर्बुद्ध आदित्य शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते आहेत, अशी टीका शेलार यांनी केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले शेलार?

धारावी पुनर्विकासातील 70 टक्के घरं सरकारच्या संस्थेअंतर्गत होणार आहेत. ही घरं दलित आणि मुस्लीम बांधवांची असू शकतात. . त्यांना हक्काचे घर मिळण्यापासून परावृत्त करणं , त्यांच्यात एक वेगळी भावना निर्माण करून तुमच्याविरोधी सरकार आहे असे स्वत:चविरोध करून वातावरण निर्माण करणे हा त्यांचा नॅरेटीव्ह आहे, अशी टीका शेलार यांनी केली. 

निर्बुद्ध आदित्य ठाकरे...

धारावीत अजूनही संपूर्णपणे सर्व्हे झालेला नाही.  2011 नंतर ज्यांना अपात्र म्हणू, असे निवासी आणि अनिवासी गाळे किती याचा सर्व्हेच पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत 20 हजार घरांचा सर्व्हे झाला आहे. असं असतानाही जो भ्रम, खोटं आणि कट केला जात आहे. निर्बुद्ध आदित्य ठाकरे 7 घरांबाबत बोलत आहेत. हा आकडा त्यांनी आणला कुठून ? धारावीच्या शिवसेना शाखेत बसून खोटे आकडे तयार करण्याचे काम आदित्य ठाकरे करत आहेत, असा टोला शेलार यांनी लगावला. 

शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते

मशाल या संस्थेने जो सर्व्हे केला तर त्यानुसार 60 हजार घरे ही 2000 पूर्वीची आहेत. आमच्या लोकांकडून माहिती घेतली त्यानुसार 2000-2011 पर्यंतच्या मुंबई शहरात कुठेही झोपड्यांना सशुल्क संरक्षण दिले आहे. धारावीमध्ये या प्रकराची 15 हजार घरे असू शकतील. 2011 नंतरची आणि Gप्लस वन अपात्र दीड दोन लाख घरे असतील अशी आकडेवारी माझ्याकडे आली आहे. कदाचित यापेक्षा जास्तही आकडेवारी असू शकते.

सर्व्हे पूर्ण न येता बेघराला घर हा जर बाबासाहेब आंबेडकरांनी  निर्माण केलेल्या संविधानातला भाग म्हणून प्रत्येक बेघराला घर मिळणार असेल तर आदित्य ठाकरेंचा विरोध का ? मराठी, मुस्लिम, दलितांना सशुल्क 2011 पर्यंतच्या धोरणानुसार धारावीतच किंवा मुंबईत अन्य ठिकाणी घरे मिळणार असतील तर यांचा विरोध का ?यांची माथी का भडकावली जात आहे?  हा एका आंतरराष्ट्रीय शहरी नक्षलवादाचा भाग आहे. आदित्य ठाकरे त्यांचे प्रवक्ते आहेत, असा आरोप शेलार यांनी केला. 

Maharashtra Election : 2024 मध्ये महायुती की मविआ? आकडेवारीतून समजून घ्या निवडणुकीचं चित्र

 ( नक्की वाचा : Maharashtra Election : 2024 मध्ये महायुती की मविआ? आकडेवारीतून समजून घ्या निवडणुकीचं चित्र )

धारावीतील पुनर्विकासासाठी उपलब्ध जागा ४३० एकर इतकी होत आहे. त्यात मैदाने, बगीचे आणि अन्य सुविधां, व्यवस्थांसाठीची जागा सोडली तर निविदेनुसार २६० एकर जागा घरे बांधण्यासाठी उपलब्ध होते. निर्बुद्ध आदित्य ठाकरेंना माझा दुसरा प्रश्न आहे, नेचर पार्क सोडलं. सुविधांसाठीची जागा सोडली  तर 630 एकरपैकी 230 एकर जागेवर घरे बनणार असतील. तर मुंबईला मोकळी जागा जास्त मिळते आणि धारावीवासीयांना घरेही मिळतायत, मग यांचा विरोध का ? असा सवाल शेलार यांनी विचारला. 

धारावीतील जागा कुणाची?

धारावीतील सगळ्या जागेची मालकी डीआरपी नावाची सरकारी कंपनीची असणार आहे. डीआरपीपीएल की कंपनी कंत्राटदार म्हणून पुनर्विकास करणार आहे. या स्पेशल पर्पज व्हेईकल 80 टक्के अदाणी आणि 20 टक्के सरकार अशी भागीदारी असणार आहे. त्यामुळे फायद्यातही सरकार भाग असणार आहे. 

धारावीच्या जागेतील मालकीच्या महापालिकेच्या अधिकाराबद्दल आदित्य आणि वर्षा गायकवाड यांनी प्रश्न निर्माण केले. त्याचेही स्पष्टीकरण आणि लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहीजे, असं शेलार यांनी सांगितलं. धारावीतील जवळपास 50 टक्के जागा बीएमसीची असेल. काही खासगी जागा आहे काही राज्य आणि काही केंद्र सरकारची जागा आहे. मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी एकच नियम आहे. जागामालकाची जागा घ्याल त्याला जागेच्या रेडीरेकनरच्या 25 टक्के रक्कम द्या. याच नियमानुसार महापालिकेची जागा जास्त असेल तर त्यांना रेडी रेकनरच्या 25 टक्के रक्कम मिळेल.  केंद्र आणि राज्य सरकारलाही मिळतील. नियमात बदल नसेल जो सरसकट नियम असेल तर त्यालाआदित्य ठाकरेंचा प्रकल्पाला विरोध का ?

'धाडसी आणि क्रांतीकारक उठावाची जाणीव ठेवा', शिंदेंच्या आमदारांनी अमित शाहांना सुनावलं?

( नक्की वाचा : 'धाडसी आणि क्रांतीकारक उठावाची जाणीव ठेवा', शिंदेंच्या आमदारांनी अमित शाहांना सुनावलं? )

चारही प्रश्नांची उत्तरे एकच आहे...खोटं बोलायचं. टेंडर डॉक्युमेंट बघायचे नाही, त्याचा अभ्यास करायचा नाही, शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते व्हायचं आणि धारावीचा विषय घेऊन, मराठी, मुस्लिम, दलितांची माथी बेघर होणार म्हणून भडकवायची हे नॅरेटीव्ह बनविण्याची किमया आदित्य ठाकरे करू पाहात आहेत. मी आणि भाजप आता थेट धारावीकरांशी संवाद सुरू करणार आहोत, असं शेलार यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंना आव्हान

अदाणी समुहाला 1080 एकर जागा दिली या आरोपांचाही शेलार यांनी समाचार घेतला.  एक जरी डॉक्युमेंट कॅबिनेटचं, महायुती सरकारचं, डीआरपीपीएलचं असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. 1080 एकर जागेवर अदाणींचे नाव नसेल तर आदित्य ठाकरेंनी राजकीय संन्यास घ्यावा हे माझे खुले आव्हान आहे.  निर्बुद्ध आदित्य ठाकरे, शहरी नक्षलवाद्यांचे बाहुले जरूर व्हा मात्र अभ्यासाअंती बोला. सत्य परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट (डीआरपी) प्रोजेक्टच्या  मालकीला देण्याचा निर्णय तो केवळ 540 एकरचा झाला आहे, मग 1080 चा आकडा आणला कुठून?कदाचित आदित्य संजय राऊत यांची ट्युशन घेत असतील त्यामुळे बेछूट बोलण्यातला त्यांचा नंबर वाढला आहे, अशी टीका शेलार यांनी केली. 

धारावी प्रकल्पासाठी अतिरिक्त जागा लागली तर राज्य सरकार शोधून देईल ही अट देखील महायुती सरकारची नाही, ती अट तुमच्या पिताश्रींनी टेंडर फायनल केली त्यात लिहिलेली आहे. त्यामुळे तुमचा हा युटर्न म्हणजेच उबाठा टर्न महाराष्ट्राच्या जनतेला नवीन नाही.

खोटं बोलायचं लिमिट आहे. डीआरपीला 25 टक्के रेडी रेकनरची किंमत द्यावी लागणार आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी  जमीन फुकट दिलेली नाही. ही रक्कम ३ हजार कोटींच्या घरात आहे.  याचा अर्थ असा की, डीआरपी ज्याच्या मालकीची जागा आहे त्या मालकाला रेडी रेकनरच्या दराने पैसे देणार आहे. याचा अर्थ महापालिकेला पडीक जागेतून पैसे मिळणार असतील तर त्याबद्दल खोटं का पसरवलं जात आहे?

टीडीआर अनियंत्रित, अमर्याद किंमतीला विकण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिला  होता. निर्बुद्ध आदित्य ठाकरे जरा अभ्यास करा. टीडीआर विक्रीमूल्यावर मर्यादा घालण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. 

आदित्य यांनी स्पष्टीकरण द्यावं

अदाणींच्या घशात मुंबई हा आरोप मुस्लिम, मराठी आणि दलितांची भडकावण्यासाठी करत आहे. धारावीत 37 एकरच्या वर महाराष्ट्र नेचर पार्क आहे. आजपर्यंत उद्धव ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड पाहाता त्यांनी शिवाजी पार्कची जागा बळकावली, महापौर निवासदेखील बळकावला. वांद्रेतील पाली हिल निवासी भागातील वेलफेअर सेंटरची जागाही बळकावली. त्यामुळे माझ्या मनात शंका आहे की  उद्धव त्यांच्या दुसऱ्या सुपुत्रासाठी डीआरपीतून नेचर पार्कची जागा काढून बळकावण्याचा प्रयत्न असल्यानेतर विरोध नाही ना अशी शंका असून यावर आदित्य यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी शेलार यांनी केली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Baba Siddique Case: 65 गोळ्या आणि बाइकऐवजी ऑटोचा वापर,आरोपींनी असा रचला कट; वाचा 10 BIG UPDATES
'निर्बुद्ध आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते', आशिष शेलारांचा घणाघात
beed vidhansabha election 2024 many leader try for candidature maharashtra election 2024
Next Article
बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच, कुणाला मिळणार उमेदवारी?