जाहिरात

'धाडसी आणि क्रांतीकारक उठावाची जाणीव ठेवा', शिंदेंच्या आमदारांनी अमित शाहांना सुनावलं?

Shivsena MLA on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावर शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

'धाडसी आणि क्रांतीकारक उठावाची जाणीव ठेवा', शिंदेंच्या आमदारांनी अमित शाहांना सुनावलं?
मुंबई:

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करुन दिल्याची माहिती उघड झाली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर  शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले शिवसेना आमदार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याग करण्यासाठी सूचीत करणाऱ्यांनी शिवसेनेच्या धाडसी आणि क्रांतीकारक एतिहासीक उठावाची जाणीव ठेवावी, असं शिवसेना आमदारांनी सुनावल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. 

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती तोडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं महाविकास आघाडी स्थापन केली. या आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी 2021 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बहुसंख्य आमदारांनी ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. नवा गट स्थापन केला.

भाजपानं त्या गटासोबत युती करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, हा इतिहास आहे. शिवसेना आमदारांनी ठाकरेंना आव्हान देत केलेल्या उठावाची जाणीव आमदारांनी करुन दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Mahadev Jankar : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का, एक पक्ष पडला बाहेर

( नक्की वाचा :  Mahadev Jankar : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का, एक पक्ष पडला बाहेर )

.... तर भाजपाचे ज्येष्ठ नेते जेलमध्ये असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमादारांसह धाडसी पाऊल उचलून उठाव केला. तसं झालं नसतं तर आजही भाजपा आमदार विरोधी बाकांवर बसले असते. त्याचबरोबर महाविकास आघीडीच्या नेत्यांनी भाजपच्या जेष्ठ नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी केली होती. अमित शाह यांच्या वक्तव्याला दुजोरा देणारी प्रतिक्रिया देणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ही जाणीव ठेवावी, असं या आमदारांनी सुनावलं. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे कोणताही वाद नको म्हणून शिवसेना आमदार अधिकृत प्रतिक्रिया देणार नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.  

फडणवीसांचं स्पष्टीकरण

दरम्यान महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर करणारी पत्रकार परिषद मुंबईमध्ये झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबतची माहिती खोटी असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Mahadev Jankar : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीला धक्का, एक पक्ष पडला बाहेर
'धाडसी आणि क्रांतीकारक उठावाची जाणीव ठेवा', शिंदेंच्या आमदारांनी अमित शाहांना सुनावलं?
Yajnavalkya Shrikant Jichkar seeks to contest from Katol for Congress, but the seat is held by Sharad Pawar's NCP
Next Article
काटोलवरून मविआत कटकटी; याज्ञवल्क जिचकर 'सांगली पॅटर्न' अवलंबणार?